Jayant Patil sarkarnama
मुंबई

कितीही गोंधळ घाला मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच!

अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री नवाब मलिक यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा राज्य सरकराने घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला होता. त्यावर विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. आणि आताही करतो, असे जोरदार प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज ठणकावून सांगितले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा निर्णय स्पष्ट केला.

नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला. विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही पाटील यांनी विरोधकांना केला.

शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र, त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली, असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही बैठक होणार असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल, अशी माहितीही पाटिल यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT