मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पीएमसी बँक घोटाळ्यातील (PMC Bank scam) पैसा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Saomaiya) यांचा मुलगा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा केला आरोप होता. याप्रकरणी नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पण अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. पण मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे. (Sanjay raut-kirit somaiya Latest political news)
यावर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. "जर कोणताही गुन्हा केला नसेल, तर पिता-पुत्र जोडी (किरीट सोमय्या आणि नील सोमय्या)) अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात का जात आहे? माझे शब्द नोंदवून ठेवा, हे पिता-पुत्र आणि केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करणारे आणखी काही लोक एक दिवस तुरुंगात जातील. बघत रहा काय होते. आतापर्यंत तुम्ही इतरांना धमकी देत होता. आता आम्ही काय करतो ते पहा, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
“आजपर्यंत पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं दाबून ठेवली होती. पण आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. यात काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पण ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे बाप-बेटे दररोज या कोर्टातून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. जर तुम्ही निर्दोष आहात तर तुम्हाला त्याची गरज का पडतेय? यातच सगळं स्पष्ट आहे. मी काही माहिती पुराव्यांसह पंतप्रधान कार्यालयात सुपूर्द केली आहे. अधिवेशन संपल की मी समोर येऊन पुराव्यानिशी सांगेल, अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये बाप बेटे जेलमध्ये जातील, असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे.
मी जे साडेतीन लोकांबद्दल म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा, मी आताच ती साडेतीन नावे सांगणार नाही, तेही अटकपूर्व जामिनासाठी जातील म्हणून नाव सांगत नाही. महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनाही झालेल्या घोटाळ्यांबाबत अटक करण्याचा अधिकार आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरही भाष्य केलं. “एसआयटीनं सांगितलं की आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलंच नाही. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत सुरु आहे. आता हे उघड होईल. आत्तापर्यंत मी यात पडलो नव्हतो. पण आता मी सगळ्यांचे मुखवटे फाडल्याशिवाय राहणार नाही. या सर्वांचे मुखवटे उतरवून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा”, असा इसाराही राऊत यांनी दिला आहे.
त्याचबरोबर भारत सरकार सक्षम आहे पण तेथील विध्यार्थ्यांना आधीच का भारतात आणलं नाही. केंद्रातील भाजप सरकारला निवडणुकीमुळे उशिरा जाग आली का, युक्रेन व पोलंडच्या सीमेवर विध्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली गेली, त्यांना उपाशी ठेवले गेले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय त्याच्यावर राजकारण करत आहे, पण त्यावेळी हे सर्वजण निवडणुकीत व्यस्त होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कुवेतच्या युद्धात 16हजार लोकांची सुटका केली होती, पण त्यासाठी गाजावाजा केला नव्हता, तुम्ही गाजावाजा करा पण मुलांचे प्राण वाचवा, असा टोलाही लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.