Jayant Patil, Ajit Pawar, Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News: अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच जयंत पाटलांनी टाकला डाव; विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवत अजितदादांची केली कोंडी

Monsoon Session: राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी

सरकारनामा ब्यूरो

NCP News: राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभागृहातील बैठक व्यवस्था विरोधी पक्षातच करण्यात यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादी पक्षाच्या उर्वरीत सदस्यांची विधानभा सभागृहात विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा विनंतीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं आहे.

अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी पक्षातील बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांकडून करण्यात आला होता. तर आता जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यासाठी विरोधी बाकावर बसण्याच्या व्यवस्थेसाठी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र दिले. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी डाव टाकत विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवत अजितदादांची कोंडी तर केली नाही ना? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, अजित पवार गटातील नवनिर्वाचित सर्व मंत्र्यांनी आज (रविवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी विनंती केली. पण यावर अद्याप तरी शरद पवारांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता पवारांच्या भूमिकेकडे देखील राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT