Jayant Patil On Opposition Leader: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे? जयंत पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

Jayant Patil Statement: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Political News: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. मात्र, याआधीच विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा असेल यावर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पर्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना तसे संकेतही दिले आहेत. "राष्ट्रवादीमधील काही आमदार सरकारमध्ये सामिल झाले आहेत. आम्हाला (शरद पवार गट राष्ट्रवादी) १९ ते २० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल", असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Jayant Patil
NCP Ministers Meet Pawar: शरद पवारांना पाहताच झिरवळ अन् बनसोडे पाया पडले; तर भुजबळ म्हणाले, 'विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला..'

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट सरकारमध्ये सामिल झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा सांगितला जात आहे. आता सोमवारी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातच विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेच राहतं की काँग्रेसकडे जातं? हे स्पष्ट होणार आहे.

याआधीही जयंत पाटलांनी सांगितलं होतं की, "संख्याबळाचा विचार केला तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल. संख्याबळ आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे विधीमंडळातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस असेल", असं ते म्हणाले होते.

Jayant Patil
NCP Ministers Meet Sharad Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांना केली 'ही' विनंती

दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नवनिर्वाचित सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याकडे विनंती केली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com