Jitendra Awhad VS Najib Mulla  sarkarnama
मुंबई

NCP VS NCPSP : अजित पवार-शरद पवारांची राष्ट्रवादी भिडली; जितेंद्र आव्हाडांच्या समोर नजीब मुल्ला समर्थकांची घोषणाबाजी, राबोडीत तणाव

Jitendra Awhad VS Najib Mulla Thane : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते आमनेसामने आले. या दोन्ही पक्षात जोरदार घोषणाबाजी झाली.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane Politics : महापालिका निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये युती झाली आहे. मात्र, ठाण्यात हे चित्र नाही. बुधवारी रात्री अजितदांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवाराच्या प्रचारासाठी राबोडी प्रभाग क्रमांक १० मध्ये आले होते. प्रचार फेरीदरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष तसेच राबोडी प्रभागातील उमेदवार नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी आव्हाड यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली.

या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनीही नजीब मुल्ला यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि काही काळ परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पोलिस आले अन्...

अचानक झालेल्या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे तेथून निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT