Jayant Patil : 'भाजपची अवस्था 'पिंजरा'तील मास्तरसारखी, तमाशाचा एवढा नाद लागलाय की, सगळे काँग्रेसमधले...' जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil Attacks BJP : 'न खाऊंगा ना खाने दुंगा असं ते सांगायचे पण, 'ये बंद करने आए थे तवायफों के कोठे मगर; सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे', असा शेर म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला. ' आज भाजपमध्ये सगळे काँग्रेसमधले ओढून नेलेत. आता आपले गडी देखील तिकडे निघालेत.'
NCP MLA Jayant Patil addressing supporters at a Sangli municipal election rally while launching a sharp attack on BJP’s ideology and political alliances.
NCP MLA Jayant Patil addressing supporters at a Sangli municipal election rally while launching a sharp attack on BJP’s ideology and political alliances.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 09 Jan : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेते मैदानात उतरले आहेत. या प्रचारा दरम्यान आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशातच सांगली महानगरपालिकांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या सभेत बोलताना जयंत पाटलांनी भाजपची तुलना पिंजरा चित्रपटातील मास्तरशी केली आहे. ते म्हणाले, 'सध्या भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तर तुणतुणे हातात घेऊन पुढे उभं रहायला लागला, असं म्हणत त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील भूमिकेवरून टोला लगावला.

शिवाय न खाऊंगा ना खाने दुंगा असं ते सांगायचे पण, 'ये बंद करने आए थे तवायफों के कोठे मगर; सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे', असा शेर म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला. ' आज भाजपमध्ये सगळे काँग्रेसमधले ओढून नेलेत. आता आपले गडी देखील तिकडे निघालेत.

NCP MLA Jayant Patil addressing supporters at a Sangli municipal election rally while launching a sharp attack on BJP’s ideology and political alliances.
Tuljabhavani prasad drugs : 'तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ड्रग्ज पुडी दिली जाईल'; तानाजी सावंतांना दणका बसणार? पुजारींनी उचलंल मोठं पाऊल

काँग्रेस सर्वधर्मभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. आणि आता काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ती परिस्थिती नाही,' अशी खंत देखील जयंत पाटलांनी बोलून दाखवली.

NCP MLA Jayant Patil addressing supporters at a Sangli municipal election rally while launching a sharp attack on BJP’s ideology and political alliances.
Congress Pune Manifesto : 'दिलेला शब्द पाळू...' अधिकारनाम्यातून काँग्रेसचा 'पुणे फर्स्ट'चा नारा

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत अकोल्यात एमआयएम सोबतच्या युतीचा दाखला देत भाजपचे दाखवायचे दात वेगळे असू सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही.

काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे, असा टोला देखील पाटील यांनी यावेळी लगावला. शिवाय आता नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्वीकारतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com