Sharad Pawar Withdraw Resignation Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Withdraw Resignation: शरद पवारांचा राजीनामा मागे अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Nationalist Congress Party President : शरद पवार यांनी निर्णय मागे घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर अखेर शरद पवार यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला आहे.

दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतला. वाय.बी.सेंटर सेंटर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला.

त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. यामध्ये पुणे, ठाणे, मंबई येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला आहे.

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, "मी पुन्हा अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे गरजेचे असते. त्यामुळे माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करण्यावर भर असेल. तसेच यापुढे पक्षवाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी यापेक्षा अधिक जोमाने काम करील", असं ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT