Sanjay Raut
Sanjay Raut  sarkarnama
मुंबई

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजपच ; राऊतांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्लामागे, भाजपचा (bjp)हात आहे. एस.टी संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)यांना भाजपचा पाठिंबा आहे,'' असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. (Silver Oak Attack news update)

शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’या निवासस्थानी राऊतांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ''शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिग केलं जात आहे. विरोधीपक्षाचा हा दळभद्रीपणाचा कळस आहे. यामुळे ते ठाकरे सरकारला अडचणीत आणू शकत नाही, त्यांची बेअब्रु होईल. शिवसेना ही नेहमीच कामगारांच्या पाठिंशी आहे,,'' असे राऊत म्हणाले. ''संपकऱ्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एकाच वेळी प्लॅटफॅाम तिकीट कुणी दिले,'' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

''एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर दोन दिवसांनी या हल्ला झाला आहे, एकीकडे गुलाल उधळला, तर दुसरीकडे हल्ला करतात, एस.टी कर्मचाऱ्यांना कुणीतरी भडकवलं असावं, माध्यमांना माहिती मिळते, पण पोलिसांना का मिळत नाही,'' असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली. इतर १०५ एसटी कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे आज शनिवारी (ता. ९ एप्रिल) त्यांच्यासह १०३ जणांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. याच निर्णयाचं एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वागतही करण्यात आलं, मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल (८ एप्रिल) काही एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी धडक दिली. संतप्त कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं दगडफेक केली. त्याचबरोबर चप्पलाही भिरकावल्या. अचानक झालेल्या या घडामोडीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT