फडणवीसांच्या काळातील आणखी एक योजना ठाकरे सरकारने गुंडाळली

ठाकरे सरकारने या योजनेकडे दुर्लक्ष केल्यापासून शेतकऱ्यांना अनुदान मिळणे थांबले होते. हळूहळू मंजूर झालेले शेततळ्याची मान्यताही रद्द करण्यात आली.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाजप-युतीच्या काळातील 'मागेल त्याला शेततळे' या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या योजनेबाबत महाविकास आघाडी सरकाने (thackeray government) महत्वाचा निर्णय घेतला आहे.

युतीच्या काळात २०१५मध्ये 'मागेल त्याला शेततळे' ही योजना सुरु करण्यात आली होती. पाण्याची उपलब्धता आणि सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, हा या योजनेचा उद्दिष्ठ होता. आता ठाकरे सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. ज्या शेतकऱ्यांना यासाठी मंजुरी मिळाली होती, त्यांना निधी मिळणार का, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. ठाकरे सरकारनं या योजनेकडे दुर्लक्ष केले होते.

ठाकरे सरकारने या योजनेकडे दुर्लक्ष केल्यापासून शेतकऱ्यांना अनुदान मिळणे थांबले होते. हळूहळू मंजूर झालेले शेततळ्याची मान्यताही रद्द करण्यात आली.

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात “मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली होती .

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
श्रेयवादातून कण्हेर योजना गुंडाळली; २० वर्षे नागरीक पाण्यापासून वंचित राहिले....

''कोरडवाहू शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनीवर पिके घेताना पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. काही शेतजमिनींवर विहिरीसुद्धा नसतात. मराठवाडा व विदर्भात परिस्थिती हलाखीची असते. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार हे जिल्हेदेखील या परिस्थितीतून सुटलेले नाहीत. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी पूरक व्यवस्था म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेकडे पाहिले जात होते. शेततळ्यांचा लाभ घेतांना वैयक्तिक व सामुदायिक अशा दोन प्रकारे लाभ घेता येत होता. आता ही योजना बंद झाल्याने कोरडवाहू शेतकरी चिंतेत आहेत.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Silver Oak Attack : माध्यमांना माहिती मिळते, मग,पोलिसांना का नाही ; अजितदादांचा सवाल

यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आणीबाणीच्या काळातील बंदीवानासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने सुरू केलेली सन्मान योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या तिजोरीवर कोरोनामुळे होणारा परिणाम आणि आर्थिक संकटामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९७५-७७ या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरीता लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, गौरव करण्यासंबंधी योजना बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com