Supriya Sule : Raviknat Tupkar
Supriya Sule : Raviknat Tupkar Sarkarnama
मुंबई

Supriya Sule : शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंचा तुपकरांना फोन!

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकातून त्यांनी अन्नत्याग सुरू केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर तुपकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेऊन, त्यांच्या दिडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर परिस्थिती काहीशी निवाळलेली होती. मात्र आता पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्याने पुन्हा कार्यकर्ते या ठिकाणा जमायला सुरूवात झाली आहे.

शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. ते चार दिवसापासून गायब होते.गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT