Ravikant Tupkar : स्वाभिमानी सेनेचे रविकांत तुपकर यांनी पोलिस स्थानकातच अन्नत्याग सुरू केले आहे. तुपकरांसह त्यांचे दिडशे ते दोनशे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुपकर हे आक्रमक झाले आहेत. तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उचलत.आक्रमक आंदोलनाचा पवित्रा उचलला होता. आंदोलनानंतर तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर तुपकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेऊन, त्यांच्या दिडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर परिस्थिती काहीशी निवाळलेली होती. मात्र आता पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्याने पुन्हा कार्यकर्ते या ठिकाणा जमायला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, सतत वर्दळ बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय भागात मोठा पोलिसांचा फौजफाटा होता. मिडीयालाही याठिकाणी काही बंधने घाल्यण्यात आलेली होती. पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन व्यवस्था, रुग्णवाहिका इत्यादी व्यवस्था होती.
शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. ते चार दिवसापासून गायब होते.गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.