NDRF team  Sarkarnama
मुंबई

NDRF News Update: एनडीआरएफ बेस कॅम्पबाबत अजित पवारांची मोठी घोषणा ; रायगडमध्ये...

Ajit Pawar Announcement on NDRF Base Camp: बेस कॅम्प गोव्यात होणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Raigad News: इर्शाळवाडीत दरड कोसळून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ बेस कॅम्प उभारण्याची चर्चा सुरूआहे. हा बेस कॅम्प गोव्यात होणार असल्याची चर्चा आहे. एनडीआरएफच्या बेस कॅम्पबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) मोठी घोषणा केली आहे.

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी या विषयाकडे लक्ष वेधलं होते. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगडमध्येच करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.

"रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याबाबत भास्कर जाधवांनी मुद्दा उपस्थित केला. परंतु हा बेस कॅम्प रायगडमध्येच कसा होईल, यावर सरकार पूर्णपणे लक्ष घालणार आहे. कारण नेहमी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा अशा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. ज्याठिकाणी दरड प्रवण विभाग आहे, त्याठिकाणीही फटका बसतो," असे अजित पवार यांनी सांगितले.

सर्च ऑपरेशन थांबवले..

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.00 वाजताच्या सुमारास घडली. सततच्या पावसामुळे बचावकार्यला काम करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु इर्शाळवाडीत स्थानिक प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. हे कलम पुढील 15 दिवसांसाठी लागू करण्यात आले आहे. परंतु हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आल्याची माहिती रविवारी शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

विकासासाठी निधी देताना माणसा-माणसात भेद निर्माण केलेला आहे. सत्तेत असलेल्या मंडळींना खैरात वाटली जाते आहे, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. निधीवाटपात सरकारने अन्याय केला, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवे म्हणाले, सरकारने सत्ताधारी आमदारांनाच निधी वाटप केले आहे. विरोधी आमदारांना निधी न देऊन सरकारने जनतेवर अन्याय केला आहे. जनतेच्या करातूनच राज्याचा विकास होत असतो. ज्या मतदारसंघातील आमदारांना निधी वाटप केला नाही, तेथील जनतेने कर भरू नये का? असा सवाल दानवे यांनी केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT