thane Banner Sarkarnama
मुंबई

Ncp News : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवे बॅनर; चिन्ह तुम्हारा, 'बाप' हमारा

Pankaj Rodekar

Thane News : हातातील घड्याळ चोरलं; पण, मनगट आमच्याकडेच आहे ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. असे बॅनर बुधवारी ठाण्यात लावण्यात आले होते. त्यातच आता शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवे बॅनर शहरात लावल्याचे दिसत आहे. त्याच्यावर चिन्ह तुम्हारा, 'बाप' हमारा असा उल्लेख करून अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. यामुळे ठाणे शहरात पुन्हा एकदा बॅनर्स वॉर पाहण्यास मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिवसेना शिंदे गटाप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला दिले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असा नवा गट तयार झाला आहे. त्यानुसार बुधवारी पक्षाच्या नावाचा बॅनर शहरात लावण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यानंतर आता नवा बॅनर लावला आहे. या बॅनरवर शरद पवार (Sharad pawar) यांचा फोटो लावण्यात आला. त्यामुळे 'जीत तो आज भी हमारी हुई है' ! चिन्ह तुम्हारा, 'बाप' हमारा, अशा शब्दांत अजित पवार गटावर निशाणा साधण्याचे काम केले आहे.

त्याच्यावर जितेंद्र आव्हाड यांच्यासह जिल्ह्यध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि अन्य एकाचे नाव आहे. या बॅनरला आता अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून काय उत्तर मिळते, हेच पाहावे लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात सातत्याने सुरू असलेल्या या बॅनर वॉरची सवय ठाणेकर नागरिकांना झाली आहे. मात्र, अजित पवार गट या बॅनरला उत्तर देईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT