Sanjay Raut On Delhi Railway Station Stampede Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : चेंगराचेंगरीत 150 प्रवाशांचा मृत्यू तर कुंभमेळ्यातून 7 हजार लोक बेपत्ता; राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut shocking claim About New Delhi Stampede : देशाची राजधानी नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत जवळपास 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात या रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती.

Jagdish Patil

New Delhi Railway Station Stampede : देशाची राजधानी नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत जवळपास 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात (Kumbh Mela) जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात या रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती.

त्यामुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अशातच आता या चेंगराचेंगरीत जवळपास 120 ते 150 लोकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. शिवाय सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप देखील राऊतांनी आहे.

दिल्ली (Delhi) रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीवर बोलताना राऊत म्हणाले, "दिल्ली रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरती जी अव्यवस्था महाकुंभच्या निमित्ताने सरकारने दाखवली त्यामुळे लोकांचा बळी गेला आहे. सरकारी आकडा 30 आहे. पण माझी माहिती अशी आहे की या चेंगराचेंगरीमध्ये किमान 120 ते 150 लोक मरण पावले आहेत."

तसंच यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत महाकुंभच्या नियोजनावर देखील टीका केली. ते म्हणाले, महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून (BJP) अशा पद्धतीने निमंत्रण दिलं जात आहे की जणू हा भाजपचाच सोहळा आहे. लोकांना भ्रमित केलं जात आहे की, तुम्ही या, तुमच्यासाठी गाड्या, जेवण, राहण्याची व्यवस्था सर्व काही करण्यात आली आहे.

सात हजार लोक बेपत्ता

मात्र, तसं काहीही नाही. या कुंभमध्ये खूप अव्यवस्था आहे अशी कुठल्याच कुंभमध्ये झाली नव्हती. योगी सांगतात की की 50 कोटी लोक आले आहेत. मग प्रयागराजला किती लोकं मरण पावलेत? तेही सांगा. जवळपास सात हजारावर लोक बेपत्ता आहेत. कुठे गेले हे लोक? एकतर ते चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत किंवा अन्य कारणाने मरण पावले आहेत, असा मोठा दावा राऊत यांनी यावेळी केला.

शिवाय दिल्ली अपघातातील मृतांचा आकडा सरकार लपवत आहे. रेल्वेमंत्री सांगायला तयार नव्हते. पण दिल्लीतील रेल्वे प्रशासनाचा एक अधिकारी अचानक बोलल्यामुळे हा आकडा समोर आला. तुम्ही कुंभचा राजकीय व्यापार चालवला आहे. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात.

दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळल्याचे आपण पाहतोय. सरकारचं त्याच्यावर नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून, दरवाजे तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार काय करतंय? मोदीजी काय करताय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT