Mahayuti Politics : CM फडणवीसांच्या 'त्या' निर्णयाचा एकनाथ शिंदेंचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह 'या' आमदारांना फटका

Police security withdrawal Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा शिंदेंच्या खासदार आणि आमदारांकडे वळवला आहे. राज्यातील पोलिसांचे अपुरे मनुष्य बळाचे कारण देत आमदार आणि खासदारांची पोलिस सुरक्षा काढून घेण्याचा निर्णयाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदेंच्या आमदार खासदारांना बसला आहे.
 Dhairyasheel Mane, Eknath Shinde,  Devendra Fadnavis
Dhairyasheel Mane, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 16 Feb : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्यानंतर टीका झाल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना नियम बदलून शिंदेंना समितीत घेतलं.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा शिंदेंच्या खासदार आणि आमदारांकडे वळवला आहे. राज्यातील पोलिसांचे अपुरे मनुष्य बळाचे कारण देत आमदार आणि खासदारांची पोलिस सुरक्षा काढून घेण्याचा निर्णयाचा फटका कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिंदेंच्या आमदार खासदारांना बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची पोलिस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृह विभागाला दिल्या आहेत.

 Dhairyasheel Mane, Eknath Shinde,  Devendra Fadnavis
New Delhi Railway Station stampede : 400 जागांसाठी दर तासाला 1500 तिकिटांची विक्री...; नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीचं धक्कादायक कारण आलं समोर

पोलिस (Police) दलातील अपुरे मनुष्यबळ आणि वाढता ताण लक्षात घेऊन राज्यातील आमदार, खासदारांना पुरवली जाणारी विशेष पोलिस सुरक्षा काढण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच फडणवीस यांनी याबाबत गृह खात्याला दिला आहे. पण जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची पोलिस सुरक्षा कायम ठेवली आहे.

राज्यात पोलिसांचे असलेले अपुरे बळ त्यात लोकप्रतिनिधींना दिली जाणारी सुरक्षा यामुळे पोलिस यंत्रणावर ताण पडत आहे. खासदार आणि आमदारांच्या सुरक्षासाठी अनेक पोलीस त्यात अडकून पडल्याने त्याचा परिणाम पोलीस यंत्रणेवर होत आहे. परिणामी अशा खासदार आणि आमदारांवरील विशेष पोलीस सुरक्षा काढून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

 Dhairyasheel Mane, Eknath Shinde,  Devendra Fadnavis
Sanjay Raut: AAP ला सत्तेपासून खाली खेचण्यास काँग्रेस अन् केजरीवालच जबाबदार!

त्यानुसार जिल्ह्यातील शिंदेंच्यासेनेच्या खासदार आमदारांच्या सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. पोलिस सुरक्षा थांबल्यामुळे लोकप्रतिनिधींना गरजेनुसार खासगी सुरक्षा घ्यावी लागणार आहे. दरम्यान यापुढे राज्यमंत्र्यांना देखील एकच पोलिस सुरक्षेसाठी मिळणार आहे. त्यामुळे भाजपमधील राज्यमंत्र्यांना देखील याचा फटका बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com