NIA Action on PFI : Sarkarnama
मुंबई

NIA Action on PFI : NIA ने फास आवळला; मुंबईसह देशभरात PFI वर छापेमारी

NIA Raid : बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात कारवाई करत एनआयने देशातील अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आहेत.

अनुराधा धावडे

Mumbai Political News : राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया थंडावल्या असे वाटत असतानाच आज सकाळी सकाळीच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी NIA ने पुन्हा छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेवर कारवाई करत देशातील डझनभर ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे.

दहशतवादविरोधी बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्यांतर्गत (UAPA) गेल्या वर्षी पीएफआयवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आज एनआयएने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत.

एनआयएच्या पथकाने विक्रोळीतील अब्दुल वाहिद शेख नावाच्या व्यक्तीच्या घराचीही झडती घेतली. 7/11 बॉम्बस्फोट प्रकरणात वाहिद शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. अब्दुल वाहिद शेख याच्या विक्रोळीतील घरासह एनआयएच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा भागातही कारवाई केली आहे.

एनआयएने संशयास्पद मोहिमांमध्ये आणि पीएफआयसाठी निधी उभारणीत सहभागी असल्याच्या संशयावरून विविध ठिकाणांहून सुमारे 7 ते 10 जणांना ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वीच एनआयएने रविवारी (08 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरम विमानतळावरून पीएफआय संशयिताला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज ही कारवाई केली आहे.

कोणकोणत्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत?

दिल्लीतील हौज काझी पोलिस स्टेशन क्षेत्रातील बल्ली मारन, राजस्थानमधील टोंक, तामिळनाडूमधील मदुराई, उत्तर प्रदेशातील बाराबंकी, लखनौ, बहराइच, सीतापूर आणि हरदोईसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर लखनऊमधील माडेगंजमधील बडी पकारिया भागात छापा टाकला. दुसरीकडे एनआयएने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे पाच ठिकाणी छापे टाकले. अब्दुल वाहिद शेखच्या विक्रोळीतील घराशिवाय एनआयएच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही झडती घेतली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT