Chhagan Bhujbal - Nilesh Rane Sarkarnama
मुंबई

Nilesh Rane On Chhagan Bhujbal : भुजबळ नेहमीच भाजपला डिवचतात, त्यांची भूमिका बरोबर नाही, निलेश राणे खवळले

Maharashtra Lok Sabha News 2024 : आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही. होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.

Chaitanya Machale

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर टीका व्यक्त करत महायुतीत मित्र पक्ष असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला होता. यापूर्वी भाजपकडून चारशे पार... अशी घोषणा देण्यात आली. यामुळे देशाचे संविधान बदलणार अशी चर्चा सुरू झाली.

ही घोषणा दलित समाजावर इतकी बिंबली की, त्यांच्या डोक्यातून हा विषय काढता काढता नाकी नऊ आले. त्यानंतर आता मनुस्मृतीचा विषय समोर आला. शाळांमध्ये आता मनुस्मृतीतील काही गोष्टी अभ्यासक्रमात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.वर्णव्यवस्था मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळली आहे. असं असताना आता पुन्हा कोणीतरी हे विषय वर काढत आहे,अशा शब्दांत भुजबळ यांनी सरकारला सुनावले होते.

भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचा भाजप (Bjp) नेते निलेश राणे यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. प्रत्येकवेळेस भाजपच्या विरोधात चुकीचे वक्तव्य भुजबळ यांच्याकडून केले जात आहे. युती बिघडविण्याची भाषा कोणी केली तर आम्हांला ते सहन होणार नाही, अशा शब्दात निलेश राणेंनी भुजबळांना सुनावले आहे. महायुतीत मित्र पक्ष म्हणून सहभागी झालेल्या पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत काही भूमिका घेतल्या आहेत. मात्र भाजपने घेतलेल्या भूमिकेवर टीका करत आपलेच म्हणणे खरे करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर कसे चालेल. मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं?, असा सवाल देखील राणे यांना उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा (Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. त्यावेळी देखील ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांना उत्तर दिले. नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. महायुतीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांनी एकत्र येत काम करण्याचा निर्धार केला आहे. मात्र आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, अशी भूमिका छगन भुजबळ घेतात. युती, आघाड्या करून हे पाहिजे, ते पाहिजे ही भाषा एका नेत्याला शोभत नाही.

आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही. होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे. अशा शब्दात भाजपच्या निर्णयांच्या विरोधात भाष्य करत भाजपला घरचा आहेर देणाऱ्या भुजबळांना राणे यांनी सुनावले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत चारशे पारची जी घोषणा होती, त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह झाला. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच घोषणा होती. म्हणजे आपण मोदी साहेबांना चॅलेंज करता का? ही माझी शंका आहे, असेही निलेश राणे यांनी म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT