Ajit Pawar News : "लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाहीत," अजित पवारांचं विधान

Ajit Pawar On Lok Sabha Election 2024 : बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये जातीवादावर निवडणूक झाली, असं अजित पवारांनी सांगितलं.
ajit pawar
ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 28 May : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुक ( Lok Sabha Electn 2024 ) पार पडली. शिवसेना ( Shivsena ) आणि राष्ट्रवादीत ( Ncp ) फूट पडल्यानं राजकीय चित्र बदललं होतं. महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई झाली. त्यामुळे राजकीय पक्ष आणि विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. या लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, "पाच वर्षे कितीही काम केलं, तरी जनता लक्षात ठेवते असं नाही. आपल्या येथील शॉर्ट मेमरी जगात कुठं नाही. त्यामुळे तीन-चार महिन्यांत काय होतेय, यावरच निवडणूक होते."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महाविकास आघाडीत असताना आम्हाला सांगितलं जायचं की, शिवसेनेविरुद्ध टोकाची भूमिका घ्या... शिवसेनेला ठोका... कारण, शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याक समाजाला फार आनंद मिळतो. पण, यानिवडणुकीत अल्पसंख्याक समाज शिवसेनेबरोबर जायला निघाला. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाही," असं अजित पवारांनी म्हटलं.

ajit pawar
Jitendra Awhad On Ajit Pawar: जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा अजितदादांना इशारा; म्हणाले,'बंद मुठी लाख की...'

"बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये जातीवादावर निवडणूक झाली. मराठा विरुद्ध मराठेतर, अशी निवडणूक झाली. आरे देश कुठं चाललंय... जग कुठं चाललंय... आपण कुठल्या जाती-पातीत अडकून बसलो आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढं जायचं म्हणतो. पण, ज्या विचारधारेतून आपण पुढे जातोय, त्या विचारधारेला ठेच पोहचेल, असं काम होता कामा नये. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मागे हटणार नाही," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

ajit pawar
Ajit Pawar News: नितीन पाटलांना दिलेला शब्द अजितदादा पूर्ण करणार; राज्यसभेची जागा साताऱ्यालाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com