Nilesh Rane
Nilesh Rane Sarkarnama
मुंबई

आमच्या घरात घुसून मिळेल ते तोडण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते : नीलेश राणेंचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दररोज बोलावून ‘राणेंचं घर कधी पाडणार,’ हे विचारायचे. त्यांनी महापालिकेचे ५० अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांना आमच्या घरी पाठवले होते. त्यांना घरात घुसून जे मिळेल ते तोडा, अशा ऑर्डर देण्यात आल्या होत्या. प्लॅन वगैरे काही बघायाची गरज नाही. मी सांगतोय ना मग घर तोडा, असे आदेश त्यांनी दिले होते, असा आरोप माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला. (Nilesh Rane's serious allegations against former Chief Minister Uddhav Thackeray)

सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलताना माजी खासदार राणे यांनी उद्धव ठाकरे, भास्कर जाधव यांच्या जोरदार टीकास्त्र सोडले. जाधवांची तर नक्कल करून राणेंनी टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत होते की काहीही करा पण नारायण राणेंना अटक करा. त्यानंतर त्यांनी आमचं मुंबईतील घर पाडण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले. अधिकाऱ्यांनी येऊन घराची पाहणी केली. त्यात तोडण्यासारखं काही नव्हतं. काही बदल होते. ते बदल उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ते बदल तीन महिन्यांत करून घ्या, असे न्यायालयाने दिले आहेत. ते आम्ही तीन महिन्यांत करू, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना उपनेते भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना नीलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनी चिपळूण शहरासाठी कधीच काही केले नाही. त्यांचा मुलगा शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. पण, त्यांनी का पोटनिवडणूक घेतली नाही. त्यांनी मुलाला राजीनामा देऊन परत निवडून आणायला हवे होते. मात्र, जाधव यांनी तसे केले नाही.

कोरोना काळात भास्कर जाधव हे दवाखान्यात पाहणी करायला गेले, तेव्हा डॉक्टर म्हणाले, साहेब रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनची टंचाई आहे. (नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांची नक्कल केली) त्यांना रेमडेसिव्हिर बोलता येत नाही आणि दुसऱ्यांची नक्कल करता. राणेंना बघून भास्कर जाधवांचं ऑक्सीजन कमी होते, ते मोजण्याचे यंत्र म्हणजे ऑक्सिमीटर. भास्कर जाधव औकतीत राहा. तुमची औकात आम्हाला शिकवू नका. ती आम्हाला माहिती आहे. भास्कर जाधव, विनायक राऊत यांना अशाच पद्धतीने बोलण्यासाठी सोडलेले आहे. त्यांचा पक्षाला दुसरा काहीही उपयोग नाही, असेही राणे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT