अंधेरीतील माघारीनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला जाणार...

राज्यातील घडामोडी आणि सरकारला नुकतीच शंभर दिवस पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर पक्षश्रेष्ठींशी त्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : अंधेरी (Andheri) विधानसभा पोटनिवडणुकीतील (By Election) माघारीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तातडीने दिल्लीला (Delhi) जाणार आहेत. राज्यातील घडामोडी आणि सरकारला नुकतीच शंभर दिवस पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर पक्षश्रेष्ठींशी त्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे. (Devendra Fadnavis will immediately go to Delhi after his retreat in Andheri)

केंद्रीय नेतृत्वाशी अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फडणवीस हे दिल्लीला जात असले तरी त्यांच्या केंद्रातील कोणकोणत्या नेत्यांशी चर्चा होणार, याबाबत मात्र अस्पष्टता आहे. कारण अंधेरीतील माघारीवरून पक्षात दोन मतप्रवाह दिसून आले होते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी ते अंधेरीतील माघारीबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Devendra Fadnavis
चंद्रकांत पाटलांच्या बैठकीला तडीपार गुंडाने लावली हजेरी

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय निवडणूक समितीत नुकतीच वर्णी लागली आहे. महाराष्ट्रातून केवळ फडणवीस यांचीच निवड झालेली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी फडणवीस दिल्लीला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Devendra Fadnavis
Gram Panchayat Election : जयंत पाटील यांना मोठा धक्का : स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतही गमावली

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसोबत राज्यातील एकनाथ शिंदे-भाजप युती सरकारला नुकतेच १०० दिवस झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या कामगिरीबाबत भाजपच्या हायकमांडशी फडणवीस यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com