sanjay Raut, Nishikant Dubey Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT vs BJP : "गांडूंचे राज्य गांडू लोकांसाठी"; निशिकांत दुबेंवर टीका करताना राऊतांनी PM मोदींपासून शिंदेपर्यंत सर्वांना फटकारलं...

Sanjay Raut response to Nishikant Dubey : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाराष्ट्र राज्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोकं जगताय, असा विचित्र दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 09 Jul : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाराष्ट्र राज्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोकं जगताय, असा विचित्र दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

अशातच आता दुबेंच्या या वक्तव्याचा समाचार ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून घेण्यात आला आहे. 'कोण हा टिनपाट डुबे?' या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून संपादक संजय राऊत यांनी अक्षरक्ष: दुबे यांची लायकी काढली आहे.

निशिकांत दुबेंनी केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी, अमित शहांचीच आहे. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी-शहांनी या ‘डुबे’चे थोबाड निवडलं आहे. दुबेचे थोबाड गटार आहे. या गटारातून सर्वोच्च न्यायालय, पहलगामचे निरपराध बळी यांच्याबाबत सतत मैलाच बाहेर पडतो.

या गटारास एकदा वरळीचे गटार दाखवावेच लागेल. राज्या राज्यांत, भाषाभाषांत भांडणे लावण्याची सुपारी आणि दलाली ‘डुबे’सारख्या लोकांनी घेतली असेल तर त्या सापळ्यात महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी अडकू नये. दुबेचा निषेध मुंबई व महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी करायलाच हवा, अशा शब्दात त्यांनी दुबे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तर देशात मोदी काळ सुरू झाल्यापासून भाजपमध्ये अनेक टुकार लोकांना भाव मिळू लागला असून पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मणिहार अशी स्थिती सर्वच क्षेत्रांत झाल्याची टीकाही सामनातून केली आहे. शिवाय निशिकांत दुबेंच्या गळ्यात असाच मणिहार आहे. ते म्हणतात आमच्या श्रीमंतीवर तुम्ही मराठी माणसे जगत आहात.

महाराष्ट्राबाहेर आलात तर मराठी माणसांना आपटून आपटून मारू, दुबेचे हे विधान महाराष्ट्राचा घोर अपमान करणारे आहे. मोदी-शहांच्या आशीर्वादाने हा दुबे अशी विधाने करतो व मोदींचे अभय असल्याने त्याला संरक्षण मिळते. तो शिवरायांच्या महाराष्ट्रावर गरळ ओकत असताना मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे कॅबिनेट शेपूट घालून बसलेले दिसले.

आपल्या अर्ध्या दाढीवरून हात फिरवत दिल्लीश्वरांची गुलामी पत्करणारे एकनाथ शिंदे व त्यांचे चाळीस चोरही दुबेच्या महाराष्ट्रासाठी अपमानजनक वक्तव्यानंतर बिळात लपले आहेत. या दुबेला त्याची जागा दाखवणारा, महाराष्ट्राचे पाणी दाखवणारा एकही मर्द माणूस भाजपच्या सरकारात, महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही.

जणू हे गांडूंचे राज्य गांडू लोकांसाठी चालवले जात आहे, अशी तिखट टीका राऊतांनी शिंदे फडणवीसांवर केली आहे. त्यामुळे दुबेंच्या वक्तव्याचा निषेध करताना राऊतांनी नेहमीप्रमाणे मोदी-शहांपासून फडणवीस-शिंदेवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. तर सामातील या टीकेला आता भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

निशिकांत दुबे काय म्हणाले होते?

अमराठी व्यक्तीला मुंबईत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून ठाकरे बंधुंवर टीका करताना दुबे म्हणाले, "गरीब हिंदी भाषिकांना काय मारता? तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवू. तुम्हाला आपटून आपटून मारू. मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी जगताय. तुम्ही मराठी किती किती टॅक्स देता? किती लोकांकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, तुमच्याकडे आहेत का?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT