Nitesh Rane, Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane VS Aaditya Thackeray : ...तर आदित्य ठाकरे जेलमध्ये असते; नितेश राणेंचं वर्मावर बोट

Worli Hit And Run Case : वरळीमध्ये जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी बोलण्याची हिंमत कशी होते?

Pradeep Pendhare

Mumbai Political News : मुंबईमधील वरळीच्या हिट अँड रन प्रकरणावरून माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे आक्रमक आहेत. या घटनेत खुनाचा गुन्हा नोंदवण्याची त्यांनी आग्रह धरला आहे. यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवले.

"मिहीर शाह याची दुसरी प्रवृत्ती म्हणजे आदित्य ठाकरे आहेत. अभिनेता सुशांत राजपूत आणि दिशा सालीन प्रकरणांमध्ये त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारने कारवाईची तत्परता दाखवली असती, तर आदित्य ठाकरे आज जेलमध्ये असते", अशा शब्दांत राणेंनी पलटवार केला.

वरळीमधील हिट अँड रन घटनेत भाजप महायुती सरकार गंभीर आहे. तिथे कोणालाही सोडणार नाही, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात वरळीमध्ये ही घटना घडली. या घटनेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा उपनेता याचा मुलगा असल्याने आदित्य ठाकरे Aaditya Thackeray या घटनेबाबत आक्रमक आहेत.

या घटनेचा क्रम पाहता यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून धरली आहे. या प्रकारावर आक्रमक झालेले नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या जुन्या जखमेवरील खपल्या काढल्या.

नितेश राणे Nitesh Rane म्हणाले, "अभिनेता सुशांत राजपूत आणि दिशा सालीन प्रकरणांमध्ये महाविकास आघाडीने कारवाईची तत्परता दाखवली असती, तर आज आदित्य ठाकरे आज जेलमध्ये असते. मिहीर शाह याचे दुसरा रूप हे आदित्य ठाकरे आहे. तीच प्रवृत्ती आहे. त्यावेळेस सुशांत राजपूत आणि दिशा सालीन यांचे दोन्ही खून हे लपवले. त्यामुळे हा पेंग्विन बाहेर वळवळतोय," अशा जहरी टीका नितेश राणेंनी केली.

"वरळीमध्ये जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी बोलण्याची हिंमत कशी होते? स्वतःचे हात सुशांत राजपूत आणि दिशा सालीन यांच्या खुनामध्ये बरबटले आहेत. ते यांना दिसत नाहीत. सगळे पुरावे गायब केले. सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले. त्यावेळी वडील मुख्यमंत्री होते, म्हणून पोलिस कमिशनरवर दबाव आणला. जो नियम मिहीर शहाला लागतो, तोच नियम आदित्य ठाकरे यांना लागतो," असेही नितेश राणे म्हणाले.

महाविकास आघाडीचे आमदार क्रॉस वोटिंग करणार

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे आमदार हे क्रॉस वोटिंग करणार आहेत. हे महाविकास आघाडीचे नेते सांगू शकत नाही. तसे जर केले, तर त्यांचे दुकान बंद होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT