Jalna Congress News : लोकसभेनंतर रावसाहेब दानवेंना काँग्रेस दुसरा धक्का देणार? विधानसभेचा प्लॅन ठरला...

Raosaheb Danve, Santosh Danve, Rajabhau Deshmukh, Kahlyan Kale : भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो काँग्रेसला सोडण्यात, यावा असा आग्रह काँग्रेसकडून धरला जात आहे.
Raosaheb Danve, Rajabhau Deshmukh
Raosaheb Danve, Rajabhau DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political News : सलग पाच वेळा लोकसभेच्या जालना मतदारसंघातून निवडून आलेले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सहाव्या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला. या विजयात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली.

जालना जिल्ह्यात 40 वर्षांनंतर काँग्रेसच्या कमबॅकमध्ये राजाभाऊ देशमुख हे किंगमेकर ठरले आहेत. आता काळे-देशमुख जोडीने आपले लक्ष भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघावर केंद्रीत केले आहे.

रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांचा लोकसभेत पराभव केल्यानंतर आता भोकरदनमधून त्यांचे चिरंजीव विद्यमान आमदार संतोष दानवे यांना घरी बसवण्याची रणनीती काँग्रेसकडून आखली जात आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला येत असला तरी तो आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू झाले आहेत. स्वतः राजाभाऊ देशमुख भोकरदन-जाफ्राबादमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो काँग्रेसला सोडण्यात, यावा असा आग्रह या जोडगोळीने केला आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत तसा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला आहे.

राजाभाऊ देशमुख हे रावसाहेब दानवे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. भोकरदन नगर परिषदेवर त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून वर्चस्व कायम ठेवले आहे.

Raosaheb Danve, Rajabhau Deshmukh
Vinayak Raut : विनायक राऊतांची विधान भवनात एन्ट्री; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणता निरोप घेऊन आले?

देशमुख यांच्या पत्नी मंजुषा देशमुख या 2016 ला भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. स्वत: राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, तर त्यांचे पुतणे राहुल देशमुख युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

कल्याण काळे Kalyan Kale यांना निवडून आणण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशमुख यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मतदारसंघ पिंजून काढतानाच संपूर्ण यंत्रणा हाताळण्यात राजाभाऊ देशमुख यांचा मोठा वाटा होता.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी भोकरदन-जाफराबाद मतदारसंघात विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 2002 मध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असताना त्यांनी पोट निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांना शब्द देऊन त्यांना आमदार करण्यासाठी मेहनत घेतली होती. तसाच शब्द यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांना देत देशमुख यांनी तो खरा करून दाखवला.

Raosaheb Danve, Rajabhau Deshmukh
Assembly Session : सरकार उद्या कोणालाही तुरुंगात टाकेल; ...ही तर निवडणुकीची पूर्वतयारी : पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर गंभीर आरोप

देशमुख यांचे घराणे पूर्वीपासून काँग्रेसशी जोडले गेलेले आहे. राजाभाऊ देशमुख यांचे वडील अॅड. भाऊसाहेब देशमुख हे 1960 ते 70 च्या दशकात काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून ओळखले जात होते. थेट गांधी घराण्याशी संबंध असणारे ते त्या काळातील एकमेव खासदार होते.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत भोकरदन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. आता या मतदारसंघात भाकरी फिरवावी, असा जोर काँग्रेसकडून लावला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड आणि ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाने जिल्हा काँग्रेसमध्ये दहा हत्तीचे बळ आले आहे. या पार्श्वभूमीवर भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला दिली, तर निश्चित विजय मळू शकतो, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.

काँग्रेस पक्षाने संभाव्य उमेदवारांची नावे मागवली असून जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Raosaheb Danve, Rajabhau Deshmukh
Nitesh Rane : नाना पटोलेंचा अपमान, मग महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस काय करते? भाजप आमदार नितेश राणेंनी डिवचले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com