मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नक्कल केल्याचा मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी जाधव यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
आमदार राणे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, ''भास्कर जाधव कुठला रोग आहे हे कोकणातील लोकांना पहिल्यादिवसापासून माहिती आहे, तो सोंगाड्या आहे. नाटकामध्ये जसा नरकासुर कुठलंही सोंग ठेवत नाही, वेगवेगळे सोंग बदलत असतो. तसेच जाधवही करत असतात. काल तो राष्ट्रवादीचा सोंगाड्या होता, आज तो शिवसेनेचा सोंगाड्या आहे आणि उदया भाजपचा पण सोंगाड्या होईल.
अशा सोंगाड्या लोकांना समाजात काय किंमत आहे? हे चिपळूणच्या आणि कोकणातल्या लोकांना विचारा. यांची कोकणामध्ये लायकी उरलेली नाही. ज्या पंतप्रधानांचे जगामध्ये नाव आहे. जगामध्ये ज्यांची ओळख आहे, या सोंगाड्याला त्याची काय किंमत कळणार? अशा सोंगाड्याना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे, अशा शब्दात नितेश राणे यांनी जाधव यांचा समाचार घेतला.
दरम्यान, वीजबिलाच्या मुद्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत विधानसभेत उत्तर देत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 लाख रुपयांच्या घोषणाचा उल्लेख केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. राऊत यांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असे खुले आव्हान फडणवीस यांनी दिले. फडणवीस आक्रमक झाल्यानंतर भास्कर जाधव राऊतांच्या मदतीसाठी धावून आले.
जाधव म्हणाले, विरोधी पक्षनेते शब्दखेळ करत आहेत. 2014 पूर्वी पंतप्रधान हे बोलले आहेत. 'काला धन लाने का की नही लाने का, कहा रखने का,' असे मोदी म्हणाल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर फडणवीस पुन्हा आक्रमक झाले आणि पंतप्रधानांची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना निलंबित करा. बहुमताच्या भरवशावर अशी नक्कल करत असाल तर त्याची लाज वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. त्यांतर जाधव यांनी सभागृहाची माफी मागितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.