chiplun bridge accident  Sarkarnama
मुंबई

Nitin Gadkari News : कोसळलेल्या उड्डाण पुलाला नितीन गडकरींचे नाव! मनसेची खोचक बॅनरबाजी

Mangesh Mahale

Mumbai News : कोसळलेल्या उड्डाण पुलाला नितीन गडकरींचे नाव देत मनसेने बॅनरबाजी केली आहे. भाजप-मनसेत वादाची ठिणगी पडल्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले बांधकाम मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. यादरम्यान या महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान सोमवारी सकाळी मोठा अपघात झाला आहे.

चिपळूण येथे पूल कोसळला. या महामार्गावरील या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या अपघाताला नितीन गडकरीच जबाबदार असल्याचे मनसेने ही बॅनरबाजी करीत म्हटलं आहे. चिपळूण येथे कोसळलेल्या पुलाला केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे नाव देऊन मनसेने वाद निर्माण केला आहे. काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला हाेता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील पुलाचा भाग मधोमध तुटल्याने खळबळ उडाली होती. या ठिकाणी नितीन गडकरी यांच्यावर शेरेबाजी करीत बॅनरबाजी केली आहे. सोमवारी काम सुरू असतानाच पुलाचा काही भाग कोसळला. या वेळी स्फोटासारखा कानठळ्या बसवणारा आवाज आला. यामुळे लोकांची पळापळ झाली.

या महामार्गावरील या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओदेखील समोर आला असून, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पुलाचा भाग मधोमध तुटल्याने त्याच्या कामाच्या दर्जाबाबतदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नितीन गडकरी यांच्या या बॅनरला भाजप काय उत्तर देणार, हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT