Uddhav Thackeray Press Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : गुवाहाटीत मौजमस्ती करायला पैसे, पण रुग्णांच्या औषधांसाठी.. ; ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल !

Uddhav Thackeray News : "मोठ्या संकटात मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी कधी औषधांची कमकतरता पडली नाही."

Chetan Zadpe

Uddhav Thackeray News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोना काळात मी मुख्यमंत्री होतो, परंतु अशा मोठ्या संकटात त्यावेळी कधी औषधांची कमतरता पडली नाही. आज मात्र सरकारी अनास्थेमुळे राज्यभरात रुग्णांचे बळी जात असल्याकडे लक्ष वेधून ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारची चिरफाडच केली. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, "काही विषय वर्षानुवर्षे तसेच आहेत. पण आज मला संताप आला आहे. कोरोनाचं संकट होतं, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा औषधांची कमतरता भासली नाही. राज्यातल्या सगळ्या लोकांचं लसीकरण झालं. मात्र, आज रुग्णालयात बळी जात आहेत. आज तुमच्या जाहिरातींसाठी पैसे आहेत. गुवाहाटीला मौजमस्ती करायला पैसे आहेत, मात्र रुग्णांच्या औषधांसाठी पैसे नाहीत. भ्रष्टाचाराची नवी साथ आली आहे."

गुवाहाटीत जाऊन टेबलावर नाचायला, मौजमस्ती करायला पैसे आहेत, पण गरिबांच्या रुग्णांसाठी औषधे खरेदी करता येत नाही का? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. राज्य सरकारमधील एक फूल दोन-हाफ कुठे गेलेत ? सरकारकडे जर औषधांसाठी पैसे नाही म्हणत असाल, तर यांचे परदेश दौरे कसे सुरू आहेत, कोट्यवधींची जाहिरातबाजी करायला यांच्याकडे पैसे कुठून येतात?, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT