BMC Covid Scam:  Sarkarnama
मुंबई

BMC Covid Scam: डॉक्टरचं नाही तर रुग्णही खोटे...; 'ईडी'च्या तपासात मोठा खुलासा

सरकारनामा ब्यूरो

BMC Covid Scam: मुंबई महापालिकेच्या (BMC) जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सक्तवसुली संचलनालयाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. 'बीएमसी'चे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही ईडी'ने छापेमारी केली.

या प्रकरणी ईडीने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'मिड डे'च्या वृत्तानुसार, लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस या कंत्राटदार कंपनीने पेपरवर दाखवलेले डॉक्टर्स प्रत्यक्षात कधीच नव्हते. इतकेच नव्हे तर, खोटे कोरोना रुग्ण दाखवून पैसे लाटल्याचा आरोप ईडी'ने केला आहे. (Covid Scam)

लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसचे व्यवस्थापनाने कोरोना सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांची यादी बीएमसीकडे सादर केली होती.त्यातील जवळपास 80 टक्के डॉक्टर्सची नावे ही बनावट होती. बोगस डॉक्टरांच्या नावाखाली कंपनीने 22 कोटी बीएमसीची रुपयांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर बीएमसीकडून पैसे उकळण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने रुग्णांची संख्याही वाढवल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक बाब म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसने बीएमसी व्यवस्थापनाने सुमारे 150 डॉक्टरांसाठी बनावट बायोडेटा आणि प्रमाणपत्रे सादर केली होती.त्याची पडताळणीही करण्यात आली नव्हती. कोरोना काळात काही डॉक्टरांनी कोविड सेंटरमध्ये केवळ दोन-तीन महिने काम केले.पण त्याच्या वर्षभर त्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर करण्यात आल्याचही ईडीच्या (ED) तपासात समोर आलं आहे.

दरम्यान, आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या लाईफलाईन कंपनीला कंत्राट का देण्यात आलं. करारासाठी बनावट कागदपत्रे सादर केली गेली. तसेच कंपनीला काळ्या यादीत टाकल्याची माहितीही कंपनीने लपवल्याचेही तपासात समोर आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT