Sanjay Raut News
Sanjay Raut News  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही ; राऊताचं सूचक Tweet ; 'हे पैज लावून..'

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut said nothing happens by accident in politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घडामोडी होत आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आज सूचक टि्वट केलं आहे. त्यांच्या टि्वटचा अर्थ राजकीय पंडित लावत आहेत. (nothing happens by accident in politics sanjay rauts suggestive tweet)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे काल (गुरुवारी) सामनाच्या अग्रलेखात राऊतांनी नमूद केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या घडामोडींवर सगळ्याचे लक्ष आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून राजकारणात अपघाताने काहीही घडत नसल्याचे म्हटले आहे. राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही. तसे घडले असल्यास, तशा प्रकारे ते नियोजितच होते, हे पैज लावून सांगू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT