Rashtrawadi New President : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. (NCP will take big decision regarding sharad pawars resignation Two plans)
पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात समितीची बैठक आहे. या बैठकीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत.सोळा सदस्यांची सकाळीअकरा वाजता बैठक सुरु होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत दोन प्लॅन ठरवले आहेत.
पहिला प्लॅन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांनी कायम राहावे.
दुसरा प्लॅन : शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहण्यास नकार दिला तर अध्यक्षपदासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावे.
पवारांनी अध्यक्षपदी कायम राहण्यास नकार दिल्यास सुप्रिया सुळे या अध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे. सुळेंच्या नावाशिवाय कुठल्याही नावाची चर्चा सध्या नाही. मात्र, पवार यांच्या धक्कातंत्राची शैली पाहता ते नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता कायम आहे.
काल (गुरुवारी) पवारांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला असला तरीही ते अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत.
‘लोक माझ्या सांगाती’ या राजकीय आत्मवृत्ताच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षापदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून सर्वांची मनधरणी सुरू आहे. पवारांनी त्यांच्या निर्णयापासून परावृत्त व्हावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या केंद्राबाहेर बसले आहेत.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.