Ajit Pawar Twitter
Ajit Pawar Twitter Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Social Media: आता अजित पवारांच्या सोशल मिडीयावरुन राष्ट्रवादी गायब; नक्की चाललयं काय?

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar Social News: आज सकाळपासून पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार भाजसोबत जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. पण परंतु अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे वृत्त फेटाळलं असून या फक्त नव्या ‌राजकीय समीकरणांच्या चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली आहे. तसेच, मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, माध्यमांनी स्वतःच्या मनाने बातम्या चालवल्या असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Now NCP disappeared from Ajit Pawar's social media; What exactly is going on)

पण दुसरीकडे अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाइलवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचा फोटो होता. तो फोटो आता गायब झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या सर्व चर्चा फेटाळल्या असतानाही त्यांच्या सोशल मिडीया प्रोफाईलवरुन राष्ट्रवादी (NCP) गायब झाल्याने अजित पवारांच्या मनात नक्की चाललयं काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Ajit Pawar In Touch With BJP)

याबाबत, अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांच्या प्रोफाईलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

इंडियन एक्सप्रेसने अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. गेल्या दोनतीन दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळातील घडामोडींनाही वेग आला होता. दरम्यान, 2019 मध्ये अजित पवारांनी केलेलं बंड शरद पवारांमुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना खुद्द शरद पवारांनी स्वतः फोन केले होते.

पण आज सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांनंतर अजित पवार यांच्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही समोर येऊन या सर्व अफवा असल्याचे सांगत भाजपसोबत जाण्याच्या चर्चा धुडकावून लावल्या. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाही असं स्पष्ट करतानाच पक्षातील सर्व सहकारी एक विचारानं पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT