Nupur sharma Latest News : भाजप नेत्या नूपुर शर्मांनी प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य विधान केलं होतं. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. शर्मा यांच्या विधानानंतर अनेक राज्यात मोठा हिंसाचार झाला होता. पैगंबर यांच्यावरील विधानावरुन अडचणीत आलेल्या नूपुर शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला आहे.
तत्कालीन भाजप (BJP) प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान प्रेषित पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अनेक मुस्लिम देशांनीही या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद पेटल्यानंतर भाजपकडून शर्मा यांच्यावर मोठी कारवाई केली होती. पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर भाजपनं त्यांना निलंबित केलं होतं. तसेंच वाद वाढल्यानंतर नूपुर शर्मा यांनी माफी देखील मागितली होती.
या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक राज्यांत गुन्हेही दाखल करण्यात आले होते. तसेच शर्मा यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या. याच धर्तीवर शर्मा यांनी स्वसंरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. आता त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे. दरम्यान, नूपुर शर्मा (Nupur Sharma) ला मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. यासोबतच त्यांच्यावर देशभरात दाखल असलेले गुन्हेही एका ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत.
नूपुर शर्मा यांच्या विधानानंतर देशात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तसेच शर्मा यांचं समर्थन केल्यानंतर राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर अमरावतीतील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची धारदार चाकुने गळा कापून हत्या केली होती. कोल्हे यांनी शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं खळबळ उडाली होती. कोल्हे हत्याप्रकरणी एनआयएनं मोठा खुलासा केला होता. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे तबलिगी जमातशी संबंधित असल्याचं स्पष्ट केलं आहेत.शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानेच कोल्हे हत्या करण्यात आल्याचंही म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.