Amit Deshmukh Sarkarnama
मुंबई

अमित देशमुखांचे आश्वासन लेखीच हवे : परिचारिका संपावर ठाम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील परिचारिका राज्यभर संपावर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : परिचारिकांच्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण (Medical Education) विभाग सकारात्मक असला, तरी लेखी आश्वासनानंतरच संप मागे घेण्याच्या भूमिकेवर त्या ठाम आहेत. बैठकीत चर्चा झालेले मुद्दे लेखी स्वरूपात मिळाले नसल्याने आणि बैठकीचे इतिवृत्तही हाती पडल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे मंगळवारी परिचारिकांनी स्पष्ट केले. (Nurses on strike in Maharashtra)

दरम्यान, परिचारिकांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री (Amit Deshmukh) केले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभाग रुग्णालयातील परिचारिकांच्या काम बंद आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांच्या भरतीसह एकूण १२ मागण्यांची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना देण्यात आली. परिचारिकांचे प्रश्न आणि मागण्या सोडवण्याबाबत सरकार सकारात्मक असून, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक त्याचा अभ्यास करतील, असे त्यांनी सांगितले. काही मागण्यांबाबत इतर विभागांचे अभिप्राय घेणे आवश्यक आहे. ते लवकरात लवकर घेतले जातील, असे त्यांनी नमूद केले. एक ते दीड महिन्याच्या कालावधीत योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोरोना योद्धा म्हणून सन्मान करूनही सरकारकडून योग्य वागणूक मिळालेली नाही. मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रलंबित मागण्यांविषयी सकारात्मकता दर्शविण्यात आली असली, तरीही लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव सुमित्रा तोटे म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT