Jitendra Awhad
Jitendra Awhad sarkarnama
मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; आव्हाडांची चौकशीची मागणी

सरकारनामा ब्यूरो

Jitendra Awhad : ठाणे : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बाबतही आक्षेपार्ह मजकूर आहे. या पोस्टचा फोटो राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट केला आहे.

या पोस्टचा फोटो आव्हाड यांनी आपल्या ट्वीटवरुन पोस्ट करत महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस यांना टॅग केले आहे. ह्याची नोंद ह्यांनी घ्यावी अकाउंट कुणाचे आहे ह्याची माहिती घ्यावी आणि कारवाई करावी, अशी मागणी करत ही पोस्ट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केली आहे.

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी अपघातात निधन झाले. मेटे यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा परसली आहे. मेटे यांच्या अपघाताची बातमी समजतातच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेटे यांच्या विषयी प्रसारमाध्यमांशी बोलत असताताना एका वृत वाहिनीच्या कमेंन्ट बॅाक्समध्ये या वादग्रस्त कमेंन्टस करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. ज्या आकाऊंट वरुन या पोस्ट करण्यात आल्या आहे, त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लोगो दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लोगो वापरून हा वादग्रस्त मजकूर कोणी पोस्ट केला हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चौकशी करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

मेटे यांच्या निधनामुळे एकीकडे शोक व्यक्त केला जात असताना या कमेंन्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या कमेंन्टचा निषेध करण्यात येत आहे. हे प्रकरण वादग्रस्त असल्याने आव्हाड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT