त्यांनी आमदारकी,मंत्रिपद द्यायचं नव्हतं..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं; मेटेंच्या आईंची प्रतिक्रिया

Vinayak Mete : कुणी बोलू द्या मला, मी कोर्टात येते. मी अडाणी बाई आहे. माझा डोंगर पेटला...
Vinayak Mete Mother Latest News
Vinayak Mete Mother Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यावर आज (15 ऑगस्ट) बीडमद्ये (Beed) अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. यावेळी अनेकांना अश्रू आवरता आले नाही.

दरम्यान त्यांच्या अपघाताबद्दल अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहे. हा अपघात की घातपात आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान मेटेंच्या आईंनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'त्यांनी मेटे यांना आमदारकी द्यायची नव्हती..मंत्रिपद द्यायचं नव्हतं..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे मेटेंच्या आईंचा हा आरोप नेमका कुणावर आहे. याची चर्चा होत आहे. याच प्रतिक्रियेचा व्हिडिओ कॅाग्रेसचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ट्विट करत या मातेची आर्त किंकाळी सरकार ऐकणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे. (Vinayak Mete Mother Latest News)

Vinayak Mete Mother Latest News
मला साहेबांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या म्हणत मेटेंच्या ड्रायव्हरने फोडला होता टाहो

विनायक मेटेंच्या आई व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया देतांना रडत असून "त्यांनी जाणून बुजून माझं लेकरू मारलं आहे. गरिबाचं लेकरू होतं. त्यांनी आमदारकी द्यायची नव्हती. मंत्रिपद द्यायचं नव्हतं. पण माझं लेकरू मारायचं नव्हतं. कुणी बोलू द्या मला, मी कोर्टात येते. मी अडाणी बाई आहे. माझा डोंगर पेटला, अशी प्रतिक्रिया मेटे यांच्या आईंनी दिली आहे. हाच व्हिडिओ ट्विट करत भाई जगताप यांनी या मातेची आर्त किंकाळी सरकार ऐकणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. यामुळे मेटेंचा खरच अपघात की घातपात, अशी चर्चा होत आहे.

मेटे यांचे रविवारी सकाळी अपघातात निधन झाले असून आज त्यांच्यावर बीड येथे अंत्यसंस्कार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला हजेरी लावण्याकसाठी मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमधला कार्यक्रम सोडून मेटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. पण वाटेत त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

Vinayak Mete Mother Latest News
विनायक मेटे अनंतात विलीन; अखेरचा निरोप देतांना कार्यकर्त्यांना भावना अनावर

दरम्यान, मेटे यांच्या अपघाताबाबात अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याबरोबरच अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे अनेकांकडून वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत.

यामध्ये आता खुद्द आता मेटे यांच्या आईंनी त्यांना आमदारकी, मंत्रीपद द्यायचे नव्हते मात्र मारायचे नव्हते, अशी प्रतिक्रिया दिली असल्याने अजूनच शंका वाढली आहे. त्यांचा हा आरोप नेमका कुणावर आहे. याचीही जोरदार चर्चा होत असून मेटेंच्या मृत्यूच गुढ वाढत चाललं आहे. यामध्ये आता कॅाग्रेसचे नेते आणि आमदार भाई जगताप यांनी पु्न्हा चौकशीची सरकारकडे मागणी केली आहे. यामुळे याप्रकरणी खरच नेमक काय घडलं याकडे राज्याचं लक्ष लागल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com