Eknath Shinde News : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) नुकतेच पार पडले. अधिवेशन आटोपल्यानंतर प्रशासकीय कामांना वेग यावे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्शन मोडमध्ये आहेत. प्रशासनातील कामे वेगाने व्हावेत, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
मात्र आज पुण्याचे खासदार व भाजप नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज निधन झाल्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या भेटीमध्ये यासंदर्भात कोणतीही चर्चा घडून आलेली आहे. मात्र या संदर्भात पुढील दोन दिवसाच बैठक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी तसेच काही पोलिस अधिकारी यांच्या बदल्यांचा विषय मागील अनेक दिवसपांसून रखडलेला आहे. या बदल्यांच्या शक्यतेने प्रशासकीय कामांवर याचे परिणाम घडून येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातच या बदल्यांबाबत निर्णय घेण्याचे नियोजन सरकारचे होते.
याच काळात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर याबद्दल सुतोवाच केले होते. मात्र यावर अद्यापर्यंत निर्णय झाला नाही. मार्च अखेरपर्यंत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील, अशी ही चर्चा होती.
या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस आज दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेट घेण्यासाठी ‘वर्षा’बंगल्यावर गेले. याच बैठकी दरम्यान अधिकाऱ्यांच्या बदलण्यावर निर्णय होऊन आजच यासंदर्भात आदेश निघणार अशी शक्यता होती. यामुळे प्रशासनातील सर्वांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीकडे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, पुण्याचे खासदार बापट यांच्या निधनाचे वृत्त आले आणि दोन्ही नेते पुण्याकडे रवाना झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.