Pune District News : मतदारसंघातील कामांना स्थगिती; आघाडीच्या 'या' आमदारांची न्यायालयात धाव

State Government : शिंदे-फडणवीस सरकारकडून अडवणूक होत असल्याचा आरोप
Atul Benake, Sanjay Jagtap, Dattatray Bharane
Atul Benake, Sanjay Jagtap, Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

मंबई : आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महविकास आघाडीच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघातील नियोजित कामांना स्थागती दिली होती. या नियोजित कामावरील स्थगिती उठवण्यासाठी अनेक महविकास आघाडीच्या आमदारांनी कोर्टात धाव घेतली आहे.

मतदारसंघातील कामांना स्थगिती दिल्याने न्यायालयात धाव घेतलेल्या आमदारांमध्ये पुणे जिल्ह्यातील दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane), अतुल बेनके, संजय जगताप (Sanjay Jagtap), चेतन तुपे यांचा समवेश आहे. निधी वाटपात असमानता झालेली आहे, असा ठपका ठेवून शिंदे-फडणवीस सरकराने महविकास आघाडीच्या सरकारच्या (MVA) काळात मान्यता दिलेल्या अनेक कामांना स्थगिती दिली होती.

या दिलेल्या वर्क ऑर्डर तपासून पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. स्थगिती दिलेल्या कामात विशेषतः २५/१५ ची कामे, जलसंधारण, नगरविकास विभाग व इतर विभागांच्या कामांना स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातील कामांना खीळ बसल्याचे आरोप आमदारांनी केला आहे.

Atul Benake, Sanjay Jagtap, Dattatray Bharane
National Anthem Case : ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ? राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

स्थगिती दिलेल्या कामांबाबत आठ महिन्यांपासून आम्ही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वेळोवेळी भेटून कामांच्या स्थगिती उठविण्याची विनंती केली होती. त्यावर मात्र तपासून निर्णय घेऊ, असेच वारंवार सांगण्यात येत असल्याचा आरोप महविकास आघाडीच्या आमदारांनी केला.

Atul Benake, Sanjay Jagtap, Dattatray Bharane
Girish Bapat News : गिरीश बापट अनंतात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

ज्या कामांना स्थगिती दिलेली आहे, ती कामे मतदारसंघातील मूलभूत व आवश्यक आहेत. कामांना स्थगिती दिल्यामुळे मतदार संघाच्या विकासक कामांना खीळ बसली आहे. आमची शिक्षा तुम्ही आमच्या मतदारसंघातील नागरिकांना का देत आहात, असा सवाल महविकास आघाडीच्या आमदारांनी उपस्थित केला आहे. उच्च न्यायालयाकडून आम्हला न्याय मिळेल अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com