Adani Group News : Acc And Ambuja :  Sarkarnama
मुंबई

Adani Group News : अदानी समूह कंपन्यांचे कार्यालये गुजरातला : १० हजार कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ..

Acc And Ambuja : कर्मचाऱ्यांच्या मुंबई - अहमदाबाद येरझाऱ्या सुरू...

सरकारनामा ब्यूरो

Adnai group headquarters in Mumbai moved to Ahembad : अमेरिकेतील संस्था यांच्या हिंडेनबर्ग यांचा अदानीसमूहासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. मात्र यानंतरही अदानीसमूहाकडून याबाबतीत काही महत्त्वाची पावले उचलण्यात आले होते. मुंबई शहरात स्थित असलेली अदानीसमूहाचे कार्यालये, गुजरातेत हलवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने एसीसी आणि अंबुजा सिमेंट (ACC And Ambuja) या कंपन्यांच्या मुख्यालयांचा समावेश आहे.

अदानी समूहांचे काही उद्योगांचे मुख्यालये गुजरातला (Gujrat News) नेल्यामुळे आता अनेक महत्त्वाचे प्रशासकीय आणि समूहाच्या धोरणात्मक निर्णय तिथूनच घ्यायला सुरू झाले आहे. मात्र कंपनीचे सीईओ हे अजूनही मुंबईत स्थित आहेत. यामुळे आता अंबुजा आणि एसीसी या कंपन्यांमध्ये दोन स्तराच्या प्रशासन केंद्र तयार झाल्याचे दिसून येत आहे. पण आता या कंपन्यांच्या कामकाज हाकताना, काही धोरणात्मक निर्णय घेताना ताळमेळ साधला जात नाही. यामुळे दोन स्तरावरून गोंधळ उडताना दिसत आहे.

अदानी समूहाकडून मागील साली सप्टेंबर माहमध्ये ६.५ अब्ज डॉलरमध्ये एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी झाली होती. या खरेदी प्रक्रियेच्या वेळी या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. पण हिंडेनबर्ग अहवालानंतर शेअर बाजाराची पडझड झाली. यानंतर चौकशीच्या संभाव्य फासामुळे अदानी समूहाची ही मुख्यालये गुजरातला नेण्यात आल्याची चर्चा आहे.

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी गुजरातमध्ये आणि कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशा परिस्थितीत या कंपन्याचा कारभार सुरू आहे. कंपनीच्या कामासाठी सतत मुंबई आणि अहमदाबाद अशा कर्मचाऱ्यांच्या चकरा होत आहेत. यामुळे कंपनीतील कर्मचारी कंटाळले आहेत.काही कर्मचारी गुजरातमध्ये स्थलांतरीत होण्याच्या मानसिकतेत नाहीत. यामुळे त्यांनी दुसरीकडे नोकऱ्या शोधण्यास सुरूवात केली आहे.

नोकरी बदलण्याचा या धोरणात मुख्यत: महिला कर्मचारी आहेत. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत मुंबई - अहमदाबाद येरझाऱ्या मारणे या महिला कर्मचाऱ्यांचा कठिण होत आहे. यामध्ये गुजरात येथे वास्तव्य करणे हा एक पर्याय आहे. मात्र नोकरी बदलता येईल का याचीही चाचपणी कर्मचारी करत आहेत.

अंबुजा आणि एसीसी सिमेंट या दोन्ही कंपन्या एकत्रित मिळून जवळपास १० हजार कर्मचारी मुंबईत सद्या कार्यरत आहेत. य़ामध्ये एकट्या एसीसी या कंपनीत ६ हजार कर्मचारी आहेत. यापैकी ६० टक्के कर्मचारी व्यवस्थापनाच्या स्तरावर काम करतात. तर बाती ४० टक्के हे फ्लोअर वर्कर्स आहेत.

अंबुजा कंपनीत ४७०० कर्मचारी सक्रिय आहेत. ७० टक्के कर्मचारी व्यवस्थापनात आहेत. मात्र आता मुख्यालय गुजरातला हलवल्याने वरिष्ठ अधिकारी गुजरात मधून कंपनीचे सूत्र हलवत आहेत. मात्र ज्या कर्मचारा्ऱ्यांना गुजरातला स्थायिक होणे शक्य नाही, अशांना मुंबई-गुजरात येरझाऱ्या करण्याशिवाय पर्याय नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT