Ban for Mob in Yavatmal : छत्रपती संभाजीनगरनंतर आता यवतमाळमध्ये 'हाय अलर्ट'; जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

Yavatmal District : समजात तेढ होण्याची शक्यता वाढल्याने उपयायोजना
Lalit Varhade
Lalit VarhadeSarkarnama

Vidarbh News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे श्रीरामनवमीच्या तयारीतून दोन गटात वाद झाला होता. त्याचे पर्यावसन दंगलसंदृश्य स्थितीत झाले होते. यात एका व्यक्तीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्य झाला. तसेच अधिकाऱ्यांसह २० पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांची वाहने जाळण्यात आली. अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली.

पोलिसांना ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या स्थितीबाबत आधीच माहिती होती तरी राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

Lalit Varhade
Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी पुन्हा तोडले अकलेचे तारे ; म्हणाले, 'गांधींबाबत गोडसेंनी योग्यच ..'

सध्याची महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील राजयकीय स्थिती पाहता, त्यातून समाजात तेढ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. याबाबत अप्पर जिल्हा दंडाधिकारी ललित वऱ्हाडे यांनी ३१ मार्च रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १३ एप्रिलपर्यंत जमावबंदी राहणार आहे. जिल्ह्यात लव्ह जिहादवरून आंदोलन, निषेध मोर्चे काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे जमावबंदी लागू केली जात असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Lalit Varhade
Maharashtra politics : ''अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे परत येण्याच्या प्रयत्नात''

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यातच महावीर जंयती, हनुमान जयंती आदी सण, उत्सवाचे वातावरण जिल्ह्यात असणार आहे. त्यातच लव्ह जिहादवरून जिल्ह्यात आंदोलन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे.

Lalit Varhade
Solapur News : पाणीप्रश्नावर सुभाष देशमुख आक्रमक....थेट देवेंद्र फडणवीसांना लावला फोन!

नामांतराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दंगलसदृश्य घटना घडेल असा अहवाल दिला होता. त्याकडे राज्यसरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातही लव्ह जिहादवरून काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या टाळण्यासाठी प्रतिबंधाकात्मक उपाय म्हणून यवतमाळमध्ये जमावबंद लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com