Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad: 'अरे पचास खोका तुमने खाया...'; जितेंद्र आव्हाडांनी ऐकवलं 'रॅप साँग'

Rap Song : राज्यासह देशात दडपशाही सुरू असल्याची टीका

सरकारनामा ब्यूरो

MVA News : मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वज्रमूठ सभेतच्या माध्यमातून राज्य सरकारसह केंद्रावरही जोरदार टीका केली. राज्य आणि केंद्र सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर धडक कारवाई करतात. विरोधकांतील नेत्यांची 'ईडी' आणि 'सीबीआय' चौकशी लावली जाते. त्यांना नाहकपणे तुरुंगात टाकले जाते. तसेच कुणी टीका केली तर त्यांनाही थेट गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकून दडपशाही केली जात असल्याचा आरोपही यावेळी नेत्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी पुणे आणि मुंबईतील (Mumbai) 'रॅप' गायकांना राज्य सरकारवर 'रॅप साँग' बनवून टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. केंद्र आणि राज्य सरकार विरोध करण्यांना अटक करीत आहे. या दडपाशाहीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवले. यावेळी त्यांनी चार ओळींचे 'रॅप साँग'च सादर केले.

जिंतेद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "पुण्यातील दोन मुंबईतील दोन मुलांनी राज्य सरकारवर 'रॅप साँग' सादर करून टीका केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले. आता मीही माझी छोटीशी कविता सादर करतो." यानंतर त्यांनी पचास खोक्यावर चार ओळी सादर केल्या.

"अरे पचास खोका तुमने खाया

महाराष्ट्रने क्या पाया?

लडके ने उसको गले पे लाया

तो पोलिसने उसको जेल दिखाया.. अरे पचास खोका..

अरे पचास खोका बोलतेही तूम क्यों चिडते हो..

अपनाही रिस्ता पचास खोकेसे क्यों जोडते हो.."

यावेळी आव्हाड यांनी राज्यातील राजकीय संस्कृती बदलल्याचे सांगितले. ते म्हणाले, "पचास खोके म्हटल्यावर तुम्हाला राग का यतोय? ते काय तुमचे आडनाव आहे का? अरे तुम्ही ते स्वतःच्या नावाला जोडून घेतले आहे. आता ते पन्नास खोके मराठी माणसाच्या मनाला टोचण्या देत आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नव्हती. ती सुसंस्कृत, विचारी होती. सध्याच्या सरकारने (State Government) ही संस्कृती बाजूला काढली. यातून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची अंत्ययात्रा काढली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT