Uddhav Thackeray : ...तर महाराष्ट्रातील जनताच अमित शाहांना जमीन दाखवेल; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

MVA Mumbai : भाजप सूडबुद्धीने वागत असल्याची टीका
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray on Amit Shah : मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्य सरकारसह केंद्रावरही जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. सध्याचे राज्य सरकारने हजारो काटींचा निधी जाहिरातीसाठी राखून ठेवला आहे. यापूर्वी २०१४ मध्येही भाजपने फक्त जाहिरातींवर खर्च केला. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यात काम करण्यावर भर दिला. ते सरकार ईडीच्या भीतीतून पाडले. आता आगामी निवडणुकीत महाराष्ट्राची जनता अमित शाह यांना जमीन दाखवेल, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : महाराष्ट्रापासून मुंबई तोडणारांचे आम्ही तुकडे करु ; उद्धव ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे म्हणाले, "आता जाहिरातींवर खर्च करणारे सरकार आले आहे. यापूर्वीही २०१४ साली भाजपचे प्रचारावरच जास्त खर्च केला. 'कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा', असे त्यांचे स्लोगन होते. सत्तेत आल्यानंतर जनतेला दिलेली सर्व आश्वासने भाजप (BJP) विसरले. काम करण्याची वेळ आली त्यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा वर काढून समजात वाद करवून आणले. आताही देशात, राज्यात महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे."

Uddhav Thackeray
Mahavikas Aghadi Sabha : आता शिंदे सरकारला जागा दाखवायची वेळ आली आहे : अजित पवारांचा इशारा

भाजप सरकार भ्रष्टाचाराचा आरोप करून सत्तेत आले. आता भाजपच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या लोकांना बरोबर घेऊन सत्ता चालवत असल्याचा घणाघातही ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, "सध्या राज्यात (State Government) ईडीचे सरकार आहेत. भाजप दुसऱ्या पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून आपल्या पक्षात घेतात. तसेच आपल्या पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना बाहेर काढतात. भाजप निव्वळ सूडबुद्धीने काम करत आहेत."

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बारसूतील आंदोलकांची भेट घेणार; तारीख जाहीर करत सरकारला दिला इशारा

यावेळी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडल्यावरून भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना आव्हान दिले. ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रात गद्दारी घडवून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. याच पद्धतीने मध्य प्रदेशचेही सरकार पाडले. भाजपच्या राजकाराणाची पद्धत सरसंघचालकांना पटतेय का? भाजप नेत्यांनी आधी त्यांची हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट करावी. आता राज्यातील पालघरमधील आदिवासींवर आत्याचार केला. बारसूतील पोलीसबळाचा वापरही विसरता येणार नाही. देशातील भाजप सराकर सूडबुद्धीने वागत आहे. आता महाराष्ट्रातील जनताच अमित शाहांना जमीन म्हणजे काय असते हे दाखवून देईल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com