Omicron- Lockdown- Maharashtra  
मुंबई

Omicron : राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या ४८ तासातच कोरोना विषाणूच्या (Corona Virus) नव्या ओमिक्रॉन व्हेरीयंट (Omicron variant) रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्याची चिंता वाढली आहे. पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने पुण्यात घबराट पसरली आहे. तर राज्यात कल्याण - डोंबिवलीमध्ये २ रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर नियम किंवा लाॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य केलं असून केंद्राने भूमिका घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर राज्यात निर्बंध लागणार का असे विचारले असता त्यांनी यावर उत्तर दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारमधील सर्वांचं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये परदेशातून जे प्रवासी येतात त्यांच्यासंबंधी केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेतली पाहिजे. देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नियमांचं काटेकोरपणे पालन होतं की नाही हे पाहण गरजेचं आहे.''

“परदेशातून आलेल्या ज्या प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे त्यांच्या घरातील लहान मुलांनाही संसर्ग झाला आहे. त्यामुळेच केंद्रसरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाची सुरुवात कशी झाली याचं उदाहरण देत म्हणाले, मार्च महिन्यात एक दांपत्य दुबईवरुन आलं. त्यांच्यामुळे त्यांना घरी सोडलेल्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाली आणि तिथून पुढे तो फोफावत गेला. काल परवा पर्यंत देशात एक दोन रुग्ण दिसत होते. पण त्यांच्या फक्त कुटुंबातच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांनाही ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

त्यामुळे अजूनही खूप जण काळजी घ्या, नियमांचं पालन करा, मास्क वापरा, ओमिक्रॉनची तीव्रता कमी आहे असे सांगण्यात आले असली तरी त्याबद्दल केंद्रीय आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकदा भूमिका स्पष्ट केली पाहिजे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.

“गेल्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यातील काही राजकीय लोकांच्या घरात विवाह सोहळे पार पडले. या सोहळ्यांमध्ये मोठी गर्दी जमली होती. हा ओमिक्रॉनचा विषाणू फार वेगाने पसरतअसंल्याच सांगितलं जात आहे. म्हणूनच देशपातळीवरुन सर्व राज्य, नागरिकांना यासंबंधीचं चित्र स्पष्ट करणं गरजेचं आहे. ओमिक्रॉनबद्दल देशपातळीवर निर्णय झाल्यास सर्व राज्यही त्यांच्या पातळीवर पुढील पावले उचलतील, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT