Sadabhau Khot, Balasaheb Patil
Sadabhau Khot, Balasaheb Patil sarkarnama
मुंबई

एफआरपीच्या प्रश्नावरून सदाभाऊंनी धरले सहकारमंत्र्यांना धारेवर...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दोन टप्यात FRP देण्याचा निर्णय रद्द करून ती एकरकमी द्यावी. अन्यथा, संघर्ष अटळ आहे, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत आवाज उठवला आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना धारेवर धरले. दरम्यान, एफआरपी एक रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी रक्त सांडले आहे. अनेक आंदोलन केली आहेत, अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत, याचे भान सरकारने ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

एफआरपीचे तुकडे केल्यावरून सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठवला. सदाभाऊ म्हणाले, एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजेत, ही शेतकऱ्याच्या दृष्टीने कवच कुंडलं आहेत. मात्र, राज्य सरकारने एफआरपी दोन टप्प्यात देणेबाबतचा निर्णय घेऊन उस उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करत आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याचा ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत त्याला FRP मिळालीच पाहिजे, हा कायदा केंद्र सरकारचा आहे. या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची दुरुस्ती आजतागायत केंद्र सरकारने केलेली नाही. त्यासंदर्भातील पत्र देखील केंद्र सरकारकडुन घेतलेले आहे. कोणतीही दुरुस्ती झालेली नसताना राज्य सरकारने FRP दोन टप्प्यात देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

परंतु, मी सरकारला सांगू इच्छितो एफआरपी एक रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी रक्त सांडले आहे. अनेक आंदोलन केली आहेत, अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. आज देखील आम्हाला न्यायालयाच्या तारखांना जावं लागत असते. तसेच दोन कारखान्यामधील 20 किलोमीटरचे हवाई अंतर देखील हे सरकार केव्हा काढणार आहे, हे देखील सांगावे आणि हा दोन टप्यात FRP देण्याचा निर्णय रद्द करून ती एकरकमी द्यावी अन्यथा संघर्ष अटळ आहे. तसेच यांसर्भात विविध शेतकरी संघटनांची एक बैठक घेण्याची विनंती करताच सहकार मंत्र्यांनी पुढच्या आठवड्यात यावर बैठक घेण्याचे मान्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT