Sanjay Raut, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मोदी 200 देश फिरले, पण एकही पाठिशी नाही म्हणून ही नौटंकी करण्याची वेळ; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Slams PM Modi Over Delegation Move : ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. त्यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत भारताने जगासमोर पाकिस्तानचा दहशतवाद्यांची पाठराखण करणारा चेहरा समोर आणला.

Jagdish Patil

Mumbai News, 18 May : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. त्यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत भारताने जगासमोर पाकिस्तानचा दहशतवाद्यांची पाठराखण करणारा चेहरा समोर आणला.

अशातच आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने नवी रणनीती आखली आहे. जगभरात दहशतवादाविरोधात भारत एकजूट असल्याचं दाखण्यासाठी आता केंद्र सरकार सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ जगभरातील विविध देशांमद्ये पाठवणार आहे. खासदारांचे शिष्टमंडळ या महिन्याच्या शेवटी प्रमुख देशांना भेट देणार आहे.

मात्र, सरकारच्या या शिष्टमंडळावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा विषय भाजपने राजकीय केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. शिवाय उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव शिष्टमंडळात असून ते काय भूमिका मांडणार? इतक्या घाईघाईने हे करायची गरज नव्हती, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

सरकारने विशेष अधिवेशन घेऊन चर्चा करावी, ट्रम्प यांच्या सोबत काय चर्चा झाली हे सांगावे अशी विरोधी पक्षाची मागणी होती. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेने गटापेक्षा आमचे खासदार जास्त आहेत, असं सांगतच हे वऱ्हाड पाठवायची गरज नव्हती. INDIA आघाडीच्या सदस्यांनी यावर बहिष्कार टाकावा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कमजोर असल्याचं दाखवत आहात, अशी टीकाही केली. ते म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये न्या. युक्रेन आणि रशियात युद्ध झाल्यानंतर त्यांच्या प्रमुखांनी भारतात शिष्टमंडळ पाठवली नाहीत. तुम्हाला कळत नाही पण तुम्ही काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करत आहात.

जगात तुम्ही हा प्रश्न घेऊ जाताय. याचा अर्थ पंतप्रधान कमजोर असून ते 200 देश फिरले, पण एकही देश पाठिशी उभा राहिला नाही. त्यामुळेच तुमच्यावर तुमच्यावर ही नौंटकी करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात राऊतांनी या शिष्टमंडळावरून मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लोबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT