Ajit Pawar : "मला नरकाचं माहिती नाही स्वर्गाचं असेल तर..."; राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकावरून अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar On Sanjay Raut book : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अटकेनंतर तुरुंगांत घालवलेल्या 100 दिवसांच्या अनुभवांवरून 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिलं आहे. या बहुचर्चित या पुस्तकाचं शनिवारी (ता.17) प्रकाशन सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला.
Ajit Pawar On Sanjay Raut book
Ajit Pawar On Sanjay Raut bookSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 18 May : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अटकेनंतर तुरुंगांत घालवलेल्या 100 दिवसांच्या अनुभवांवरून 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिलं आहे. या बहुचर्चित या पुस्तकाचं शनिवारी (ता.17) प्रकाशन सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला.

या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संजय राऊतांनी या पुस्तकातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाय साहजिकंच भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने या पुस्तकावर टीका करत खिल्ली देखील उडवली आहे.

Ajit Pawar On Sanjay Raut book
Sharad Pawar Warning : ईडीबाबत शरद पवारांचा इशारा ठरतोय खरा, स्वतःच सांगितला पंतप्रधान मनमोहन सिंगांसोबतच किस्सा!

अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना मिश्कील टोला लगावला आहे. पत्रकारांनी संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तका संदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "मी काय त्यावर बोलणार नाही, मला काही बोलायचंही नाही.

मी हे पुस्तक वाचलेल नाही. शिवाय मला नरकाचं काय माहिती नाही, स्वर्गाचं असेन तर सांगेन, असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला देखील लगावला. त्यामुळे ज्या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या उपस्थितीत झालं त्याच पुस्तकावर अजितदादांनी मिश्किल टिपण्णी केल्याचं पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar On Sanjay Raut book
Mahayuti strategy : विधानसभेत एकहाती विजय मिळवणाऱ्या महायुतीची रणनीती फसणार! महापालिका निवडणुकीत डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी होणार कसरत

दरम्यान, या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला. "कथा कादंबऱ्या आणि बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली आहे.

तर दुसरीकडे संजय राऊतांच्या पुस्तकाच नाव बद्दलण्याची गरज असून नरकातला राऊत असं पुस्तकाचं नाव ठेवावं, याबाबत आपण राऊतांना पत्र पाठवणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com