Deputy Chief Minister Eknath Shinde is seen amid growing political developments as six MPs from the Thackeray-led Shiv Sena reportedly move closer to joining his faction under Operation Tiger. sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : ठाकरेंच्या 6 खासदारांचा पक्षप्रवेश तुर्तास लांबणीवर! 'या' अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून एकनाथ शिंदेंची नवी खेळी...

Eknath Shinde's Operation Tiger : लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांचे पुढील आदेश आले आणि त्यांनी परवानगी दिल्यास बंडखोरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, सध्या या ऑपरेशन टायगर संदर्भात काहीही अधिकृतपणे जाहीर करायचं नाही, असं शिवसेनेने ठरवल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Shivsena News, 18 Jun : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदारांना आपल्याकडे घेण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवले आहे. त्यानुसार आता या खासदारांनी वेगळा गटही स्थापन केल्याचं आणि त्याबाबतचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्यामुळे शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांचे पुढील आदेश आले आणि त्यांनी परवानगी दिल्यास बंडखोरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, सध्या या ऑपरेशन टायगर संदर्भात काहीही अधिकृतपणे जाहीर करायचं नाही किंवा याबाबतचे पुरावे द्यायचे नाहीत, असं शिवसेनेने ठरवल्याची माहिती समोर आली आहे.

तर खासदारांचा स्वतंत्र गट शिवसेनेत विलिन करताच हे 6 खासदार 19 जूनला वर्धापनदिनी एकत्र येणार असल्याची आणि ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता या खासदारांचा पक्ष प्रवेश दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

या निर्णयामागे तांत्रिक तसेच भावनिक कारणे असून कोणतीही घाई न करता शिंदेंनी अत्यंत सावध पवित्रा घेण्याचं ठरवलं आहे. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे.

कारण ठाकरेंनी ऐनवेळी व्हिप बजावल्यास कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, खासदारांचे हे बंड त्यांच्या समर्थकांना पटले नसल्याने सध्या या खासदारांच्या मतदारसंघात प्रचंड संतापाचं वातावरण आहे.

शिवाय सोशल मीडियावर देखील या खासदारांविरोध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी होणारा पक्षप्रवेश लोकांचा रोष पाहता टाळल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT