मुंबई : सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर त्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. शिवसेना (ShivSena) २५ वर्ष युतीत सडली असो ते म्हणत आहेत. मात्र २०१२ पर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत भाजपवर टीके केली होती. त्यावर पत्रकारपरिषद घेत फडणवीस यांवी ठाकरे यांच्यावर तोफ डागली. या वेळी फडणवीस म्हणाले, भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे का असा सवाल आमच्या मनात येतो. भाजपच्या सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचा पक्ष होते. आता भाजप सोडल्यावर चौथ्या क्रमंकावर गेले. मग कोणासोबत सडले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तेच ते मुद्दे आहेत. त्यांचे भाषण आता शिवसैनिकांना पाट झाले असेल. राम जन्मभूमिच्या आंदोलनात तुमचे कोण होते? भाषणाच्या पलिकडे तुमचे हिंदुत्व काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचे हिंदुत्व हे कागदावरचे हिंदुत्व आहे. हिंदुत्व जगावे लागते, असे फडणवीस म्हणाले.
तुमच्या आधी आमचा मुंबईमध्ये नगरसेवक होता. लोकसभेची निवडणुक शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर लढवली होती. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते. राम जन्मभूमीच्या वेळी आम्ही लाठ्या काठ्या खात होतो. राम मंदिरचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडवला, असेही फडणवीस म्हणाले. तुम्ही मंलगडचा विषय सोडवू शकला नाहीत. 370 कलम रद्द करताना तुमची दुटप्पी भूमिका होती, असा आरोप फडणवीस यांनी केला. मोदींनी शहरांची नावे बदलली, तुम्ही काही करु शकले नाही. ३७० कलम रद्द करताना तुमची भूमिका दुटप्पी होती.
भाजप स्वतःच्या भरवशावर आपले सरकार बनवेल आणि वेगळे लढून देखील नंबर एक भाजप आहे, हे आम्ही दाखवले. ते आपल्या भाषणात म्हणाले दिल्लीत शिवसेनेचा झेंडा असता. जेव्हा तुमची लाट होती तेव्हा 180 उमेदवार लढवले त्यातील 179 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2002 मध्ये 39 उमेदवार लढवले आणि सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. तुम्ही जागा लढवल्या पण तुम्हाला लोकांनी नाकारले, असेही फडणवीस म्हणाले.
बाळासाहेबांसाठी एक ट्वीट सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून करुन दाखवा. सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडील लावून बसता. हिंदूत्वाचे बोलणे तुमच्या तोंडी शोभत नाही. या भाषणात महाराष्ट्रासाठी काहीच नाही. महराष्ट्रावर काय बोलणार, दररोज होणारी लुट, दरोडेखोडी, माजी गृहमंत्री जेलमध्ये आहे ते बोलणार का, असा सवाल फडणवीस यांनी केला. इकते भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनूभवले नाही. तुम्हाला चौथ्या क्रमांकावर गेल्याची निराशा असू शकते, पण ती अशा प्रकारे व्यक्त करुन नका, असा चिमटाही फडणवीस यांनी ठाकरेंना काढला. राज्याच्या गव्हर्नसवर थोडा फोकस द्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.