मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले, म्हणाले, 'मी यावर समाधान मानणार नाही'

ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी.लढाई निर्णयाक निष्ठेने असते. सहकारात आपण काय करतो आहे?
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती रविवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं. तसेच नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूक निकालावरुन मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे (shivsena) कान टोचले. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चैाथ्या क्रमांकावर आहे.

''नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांक वर असलो तरी आम्ही जागा किती लढवल्या अगदी युती मध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या. आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हवे. इतर वेळा मी पण या निवडणुकीत फिरलो नाही हे टाळायला हवे. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी.लढाई निर्णयाक निष्ठेने असते. सहकारात आपण काय करतो आहे? गावात संस्था निर्माण कराव्यात नियमबाह्य नाही. सत्तेचा दूरगामी उपयोग व्हावा. संधीचे सोने करा,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

जेव्हा युती करून निवडणूक लढवत होतो त्यापेक्षा अधिक जागा शिवसेनेच्या निवडून आल्याचा दावा ठाकरे यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायत ते जिल्हा बँक आणि स्थानिक निवडणुका जिद्दीने लढण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. ''आपण असे काय केले तर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप साहेब मारतील, असा रोज विचार करा,'' असे मुख्यमंत्री म्हणाले. ''मी यावर समाधान मानणार नाही,'' असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''भाजप विरोधी लढ्यात आपण एकमेव पक्ष. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीसारखे लढा. यापुढे प्रत्येक निवडणूक बँक, स्वराज्य संस्था लोकसभा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या. निवडणुकीत निष्काळजीपणा नको. फाजिल आत्मविश्वास नको. आजही साहेब आपल्यातच आहेत असे समजा,'' ''प्रत्येक निवडणूक बँक, स्वराज्य संस्था लोकसभा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या,'' असे त्यांनी शिवसैनिकांनी सांगितले.

Uddhav Thackeray
देशातील सर्वात उंच व्यक्तींची राजकारणात एन्ट्री ; उत्तरप्रदेशात 'सायकल'वर स्वार

''शिवसेनाप्रमुखांनी बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर आपल्याला अभिमान आहे, असे म्हटले होते. त्यावेळी देशभरात शिवसेनाप्रमुखांची लोकप्रियता होती. आपण त्याचवेळी महाराष्ट्रातून सीमोल्लंघन केले असते तर न जाणो आज दिल्लीत आपला पंतप्रधान दिसला असता, असे सांगत ठाकरे यांनी दिल्ली काबीज करण्यासाठी यापुढे देशभरात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. सुरुवातीला भाजपच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती. आता ते सत्तेत आहेत. त्यामुळे आपल्याही आयुष्यात एक दिवस येईल,'' असा आशावाद ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जागवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com