CJI Bhushan Gavai in Assembly Sarkarnama
मुंबई

Opposition Leader row : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा वाद थेट सरन्यायाधीशांच्या कोर्टात; नेत्यांनी साधली संधी...

Concerns Over Delay in Leader of Opposition Appointment : विरोधी पक्षातील आमदारांनी सरन्यायाधीशांना याबाबतचे निवेदन दिले. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.

Rajanand More

Assembly Session 2025 : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून राज्य सरकारचा निषेध केला. तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार झाल्यानंतर त्यांच्याकडेही हा वाद नेण्यात आला आहे.

सत्कार झाल्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी सरन्यायाधीशांना याबाबतचे निवेदन दिले. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्ह व मुळ पक्षाच्या वादाकडेही सरन्यायाधीशांचे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आज भारताचे सरन्यायाधीशांचा आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्यावतीने सत्कार केला आहे. ते होत असताना आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात काय सुरू आहे, विरोधकांचा आवाज कसा दाबला जात आहे, सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्षनेतेपदाची निवड केलेली नाही, याबाबत सरन्यायाधीशांना अवगत केले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळात आज सकाळी विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार आंदोललन केले. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव, जयंत पाटील आदी नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला.

विरोधकांकडून भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी सुचविण्यात आले आहे. पण त्यावर अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही. सरकार सत्तेत आल्यापासून हा निर्णय बारगळलेला आहे. विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक पुरेसे संख्याबळ नसल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तर विधानसभा अध्यक्षांकडून नियम व परंपरांचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT