CJI Bhushan Gavai in Assembly
CJI Bhushan Gavai in AssemblySarkarnama

Maharashtra Politics : नार्वेकरांनी सरन्यायाधीशांसमोरच सत्ताधारी, विरोधी आमदारांना लगावला टोला...

Maharashtra Monsoon Session 2025 News update: महाराष्ट्रातील राजकीय व प्रशासकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर.
Published on

Assembly Session News : आमदारांना टोला

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना टोला लगावला. विधिमंडळात आयोजित या कार्यक्रमात आभार प्रदर्शन करताना नार्वेकर म्हणाले, तुमच्या लोकप्रियतेबद्दल इतके दिवस फक्त ऐकून होतो. पण तुम्हाला सांगतो, एक आठवडा झाला अधिवेशन सुरू होऊन. पण एक आठवड्यात जेवढी उपस्थिती सभागृहात दिसली नाही, ती आज इकडे दिसतेय. त्यामुळे तुमच्या लोकप्रियतेबद्दल अधिक काही बोलायची गरज आहे, असे मला वाटत नाही.

Rahul Narvekar News : सरन्यायाधीशांची झाली होती भेट

विधानसभेचे अध्यक्ष राहुल गवई यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी एक किस्सा सत्कार समारंभात सांगितला. नार्वेकर म्हणाले, आजच्या कार्य़क्रमाचे आमंत्रण देण्यासाठी मी त्यांची भेट घ्यायची वाट बघत होतो. मी त्यांना फोन केला पण कार्यक्रमात असल्याने बोलणे होऊ शकले. पण मला आश्चर्य वाटले की, त्यांनी त्यांच्या मोबाईलवर मला फोन केला आणि आमंत्रण द्यायला यायची गरज नाही. महाराष्ट्र हे माझे घर आहे आणि महाराष्ट्र विधीमंडळात यायची संधी मी काय हुकवणार नाही, या शब्दांत सांगून त्यांनी आपुलकीने हे आमंत्रण स्वीकारले.

CJI Bhushan Gavai News :  राजकीय पक्षांनी जातपात हे भेद बाजूला ठेऊन...

सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश भूषण गवई संविधान आणि त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आम्ही अशी घटना तयार केली आहे, जी शांततेच्या काळात त्याचप्रमाणे संक्रमणाच्या काळात ही घटना देशात जोडून ठेवेल. त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या भाषणात इशारे दिले होते. बऱ्याच मुश्किलीने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. जर हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचे असेल तर या देशातील राजकीय पक्षांनी जातपात हे भेद बाजूला ठेऊन त्यावर देश कसा राहील, यादृष्टीने कार्य करण्याची आवश्यकता आहे. आम्ही राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय या घटनेमुळे दिल्याचेही आंबेडकर म्हणाले होते.

Devendra Fadnavis News : सरन्यायाधीशांचे तोंडभरून कौतुक

विधिमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव केला. हायकोर्टात असताना येथील इन्फ्रास्ट्रक्चर, वकिलांसाठी सुविधा करण्याचे काम त्यांनी केली. न्यायालय सरकार आणि वकिलांमधील दुव्याचे काम त्यांनी केले. समन्वयाने, चर्चेने काम झाले पाहिजे असा प्रयत्न त्यांनी केला. एखाद्या वकिलाला काही जमेत नसेल तर गवईसाहेब त्यांना समजावून सांगायचे, केसमध्ये कुठले मुद्दे यायला हवेत. त्यामुळे वकिलांनाही ते आपलेसे वाटायचे. गवईसाहेब आपल्याला सांभाळून घेतील, असे वकिलांना वाटते. कुठल्याही कारणासाठी वकिलांचे मतदान घेतले तर बहुमत गवईंना मिळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

Avinash Jadhav News : नरेंद्र मेहताच मोर्चाला जबाबदार

मीरा-भाईंदर मोर्चाआधीच पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर मोर्चा निघाल्यानंतर जाधव यांनाही सोडून देण्यात आले. मोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणीही ते आले. याठिकाणी माध्यमांशी बोलताना जाधव यांनी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. व्यापाऱ्याला मारहाणीचा व्हिडीओ त्यांनीच व्हायरल केला होता. त्यांच्यामुळेच हा मोर्चा निघाला, असा दावा जाधव यांनी केला. आता कुणी आमच्या नादाला लागणार नाही, असेही जाधव म्हणाले.

Mira Bhayander Morcha : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा

मीरा-भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. इथं माज फक्त मराठीचाच चालेल. मराठी म्हणून अंगावर याल तर सोडणार नाही. व्यापारी आहात गपचूप व्यापार केला. मराठी अपमान केल्यास कानाखाली बसणारच, असा इशारा देशपांडे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com