eknath shinde latest news sarkarnama
मुंबई

'मशाल' नंतर आता 'ढाल-तलवार' ला विरोध ; सचखंड गुरुद्वाराचे निवडणूक आयोगाला पत्र

Eknath Shinde : तलवार व ढाल हे देखील शीख समाजाची धार्मिक प्रतिके आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह म्हणून ढाल, तलवार देऊ नये.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना पक्ष नाव, धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर ठाकरे गट, शिंदे गटाला (eknath shinde) पक्षाचे नाव व नवीन चिन्ह मिळाले आहे. मात्र दोन्ही गटाला मिळालेल्या चिन्हावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गटांच्या नवीन चिन्हामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (eknath shinde latest news)

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या चिन्हांचे वाटप केले आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ’ हे नाव मिळाले आहे. तर,शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे.

ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह तर, शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह देण्यात आलं होते.पण ठाकरे गटाच्या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर आता ढाल-तलवार'लाही विरोध होत आहे.

समता पार्टी आज (शनिवारी) ठाकरे गटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. मात्र, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालय ऐकून घेणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर समता पार्टी ने हे चिन्ह त्यांच्या पक्षाचं असल्याचा दावा केला आहे.

निवडणूक आयोगाने समता पक्षाला unrecognised party जाहीर केलं आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्याने शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हालाही आक्षेप घेतला आहे. त्यांनी निवडणूक आगोलाला पत्र दिले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांचे निवडणूक चिन्ह वादात सापडले आहेत.

शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हाविरोधात सचखंड गुरुद्वाराचे माजी सदस्य रणजीत कामठेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. "त्रिशूळ हे धार्मिक परंपरेचे प्रतिक आहे. त्यामुळे ते चिन्ह म्हणून राजकीय पक्षांना दिले जात नाही. त्याप्रमाणे तलवार व ढाल हे देखील शीख समाजाची धार्मिक प्रतिके आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह म्हणून ढाल, तलवार देऊ नये," असे कामठेकर यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT